Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साहित्य चाचणी अहवाला बिना अंतिम देयके मंजूर;

  साहित्य चाचणी अहवाला बिना अंतिम देयके मंजूर; साबा विभागाचा अजब प्रकार नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चीफ  (संपादक:- हेमकांत गायकवाड)  ...

 साहित्य चाचणी अहवाला बिना अंतिम देयके मंजूर;

साबा विभागाचा अजब प्रकार

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चीफ 

(संपादक:- हेमकांत गायकवाड) 

चोपडा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असलेल्या सर्व कामांना जसे की रस्ते पूल शासकीय इमारती या सर्व बांधकामांना बांधकाम करण्यापूर्वी दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडून कामात वापरात येणारे स्टील खडी मुरूम डबर डांबर सिमेंट माती विटा फेवर ब्लॉक खडीच्या कच किंवा जे जे साहित्य वापरले जाईल त्या साहित्याची गुणवत्ता तपासून ते वापरण्यासाठी योग्य आहे का किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी साहित्य चाचणी अहवाल दिला जातो या साहित्य चाचणी अहवाला शिवाय कंत्राटदार बांधकाम करू शकत नाही ज्या बांधकामासाठी साहित्य चाचणी अहवाल घेतलेले नाहीत त्या कामांचे बिले सक्षम अधिकारी मंजूर करू शकत नाही किंवा साहित्य चाचणी अहवाल नसल्या कारणास्तव संबंधित ठेकेदाराकडून त्याने चुकविलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम सक्षम अधिकारी अंतिम बिलातून कापून घेतात किंवा त्यास दंड आकारतात जळगाव जिल्ह्यात आदिवासी विकास विभागा अंतर्गत सन 2022 ते सन 2023 या कार्यकाळात चार कोटी 85 लाख रुपये एवढ्या निधीची कामे फक्त यावल तालुक्यात झालेली असून त्या कामापैकी दोन कामे म्हणजे डोणगाव किनगाव ईच खेडा वाघजीरा वडरी परसाळे यावल अठरावल आमोदा हा प्रमुख जिल्हा मार्ग 11 किलोमीटर मधील पाच ते आठ मधील रस्त्याचे मजबुतीकरण करणे व डांबरीकरण करणे व तळोदा प्रकाशा चोपडा यावल रावेर राज्य मार्ग चार चार सीमा रस्ता मधील रस्त्याचे द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती करणे या दोघेही कामासाठी कंत्राटदारांनी सदर कामांचे सहायक संशोधन अधिकारी दक्षता व गुण नियंत्रण जिल्हा प्रयोगशाळा जळगाव यांच्याकडून आवश्यक असलेले साहित्य चाचणी अहवाल घेतलेले नाहीत असे मला जा क्र द व गुणी जिल्हा प्रयोगशाळा अनुक्रमांक 25 52 व 25 53 दिनांक 11 जून 2024 च्या पत्रात कळविले आहे म्हणजेच दोघेही कामांमध्ये कमालीची निक्कृष्टता असून तळोदा प्रकाशा शहादा चोपडा यावल रावेर राज्य मार्ग चार या सीमा रस्त्याचे द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती फक्त कागदावर झालेले असून कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन व उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम यावल यांनी मिळून मिसळून निधी लाटलेला आहे सदर कामांचे साहित्य चाचणी अहवाल नसताना देखील लेखनिक लेखापाल लेखापरीक्षक उपकार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन यांनी कंत्राटदारांना पाचपटीच्या दंड आकारला नसून अंतिम अंतिम देयके मंजूर केलेली आहेत यावल भुसावळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून यासाठी संबंधित कंत्राटदाराने कोणतेही मानके घेतलेली नाहीत वा संबंधित काम निविदा नुसार होत नाही अशा आशयाची तक्रार यावल येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केली असता जावक क्रमांक 674 दिनांक सहा नोव्हेंबर 2023 च्या पत्रात उपविभागीय अधिकारी यावल यांनी संबंधित कंत्राटदारास सदर काम मानकानुसार होत नसून साहित्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घ्यावी व तदनंतरच सदरचे कामावर साहित्य प्रत्यक्ष वापरण्यात यावे सदर रस्ता यावल व भुसावळ या दोन प्रमुख शहरांना जोडणारा रस्ता असल्याने फार मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते त्यामुळे आपण सदर रस्त्याचे काम निविदा अटी शर्तीनुसार पूर्ण करावे आपण अटी शर्तीच्या भंग केल्यास व मानका नुसार काम पूर्ण न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे याचा अर्थ म्हणजेच जर त्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली नसती तर सदर कंत्राटदार व उपविभागीय अधिकारी यांचे साठे लोटे विना साहित्याच्या चाचणी अहवालाने सुरूच राहिले असते असे चित्र दिसते दरम्यान मागील वर्षे यावल उपविभागात अंतर्गत असलेल्या कामांवरील अनेक भराव देखील वाहून गेले होते याची जाणीव अधीक्षक अभियंता पीपी सोनवणे यांना होती परंतु यावल सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन व उपविभागीय अधिकारी हे त्यांच्या खास मर्जीतील असल्यामुळे सदर कामांचे चाचणी अहवाल न घेता अंतिम देयके मंजूर करून घेतात अशी चर्चा ऐकण्यास मिळते.


जयराम कोळी पत्रकार 99 601 12 904

No comments