adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमळनेर येथील कोळी जमातीच्या बिऱ्हाड मोर्चास धाडस संघटनेचा जाहीर पाठिंबा..

  अमळनेर येथील कोळी जमातीच्या बिऱ्हाड मोर्चास धाडस संघटनेचा जाहीर पाठिंबा.. १५ जुलै २०२४, सोमवार रोजी स. ११ वा. अमळनेर येथील तिरंगा चौकापास...

 अमळनेर येथील कोळी जमातीच्या बिऱ्हाड मोर्चास धाडस संघटनेचा जाहीर पाठिंबा..


१५ जुलै २०२४, सोमवार रोजी स. ११ वा. अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयावर काढण्यात येणार भव्य बिऱ्हाड मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलन

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

 आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे जातप्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, यासाठी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) व अमळनेर कोळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरु सोनवणे यांच्या नेतृत्वात १५ जुलै २०२४, सोमवार रोजी स. ११ वा. अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य बिऱ्हाड मोर्चास व बेमुदत ठिय्या आंदोलनास धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख शरद तायडे, जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी त्यांच्या धाडस संघटनेचा पाठींबा जाहीर केला आहे. याप्रसंगी धाडस संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे, युवाध्यक्ष चंदन कोळी, कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, जिल्हासचिव चंद्रशेखर कोळी, मानसिंग सोनवणे, किरण भावसार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण कोळी, उपतालुकाध्यक्ष एकनाथ सैंदाणे (जळगाव), मोहन सपकाळे, गजानन कोळी (यावल), किरण कोळी (धरणगाव), सोपान देवराज (चोपडा), दिपक सोनवणे (भुसावळ), एडव्होकेट विनोद सोनवणे (जामनेर), किशोर कोळी (पाचोरा), विनोद कोळी (रावेर) यांचेसह धाडस संघटनेचे शेकडों कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

      आजपर्यंत जळगांव जिल्ह्यातील विविध प्रकारच्या प्रश्नांवर धाडस संघटनेने आवाज उठवला आहे. तसेच आदिवासी टोकरेकोळी जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. परंतु सर्वच राजकीय पक्षांची नेतेमंडळी व काही सामाजिक संस्था संघटनांचे संधीसाधु पुढारी हे निवडणूक काळात कोळ्यांना भुलथापा देऊन मते मिळवतात, निवडून आल्यावर पध्दतशीरपणे त्यांच्या तोंडाला पाने पुसतात. यापुढे असे व्हायला नको म्हणुनच अमळनेरातील १५ जुलै सोमवार रोजी होणाऱ्या आपल्या न्याय्य व हक्कांसाठीच्या बिऱ्हाड मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलनात समाजबांधवांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन धाडस सामाजिक संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी ह्या पत्रकांन्वये केले आहे.

No comments