ट्रक ने मोटारसायकल ला मागुन कट मारल्याने अपघात अपघातात माचले ता.चोपडा येथिल युवकाचा मृत्यू नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संप...
ट्रक ने मोटारसायकल ला मागुन कट मारल्याने अपघात
अपघातात माचले ता.चोपडा येथिल युवकाचा मृत्यू
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
दिनांक ०७.०७.२०२४ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेच्या सुमारास चोपडा ते यावल रोड वर पद्म मोहन मंगल कार्यालय समोर रोडवर सार्व. जागी अयूब भाई अब्दुल गणी बोहरा वय ५२ रबीचा मोहल्ला बोरसद ता.जि. आनंद( राज्य गुजरात) हा ट्रक नंबर (GJ २७ TT ९४२५) वरील चालक भरधाव वेगाने जात असताना त्याने कुलदिप अशोक पगारे वय २२ रा.माचला ता. चोपड़ा जि. जळगाव यांच्या मोटारसायकल ला मागुन कट मारला या अपघातात कुलदिप अशोक पगारे वय २२ रा.माचला ता. चोपड़ा जि. जळगाव याचा दिनांक ०७.०७.२०२४ रोजी मोटार अपघातात मार लागल्याने त्यास उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासून पाहता मयत घोषीत केले होते याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी अयुब भाई अब्दुल गणी बोहरा वय ५२ रा. बोभा मोहल्ला बोरसद ता.जि. आनंद राज्य गुजरात याने त्याचे ताब्यातील ट्रक नंबर GJ २७ TT ९४२५ हिस रस्त्याच्या परिस्थिती कडेस दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांची मोटर सायकल क्रमांक MH-१९ KK-८०९६ हिस मागुन कट मारुन फिर्यादीच्या किरकोळ दुखापतीस व कुलदिप अशोक पगारे यांचे मरणास व मोटर सायकलच्या नुकसानीस कारणीभूत ठरला असुन रविंद्र आधार सेंदाणे वय १८ धंदा मुजरी रा.माचला ता. चोपडा जि. जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपड़ा शहर पो.स्टे. CCTNS (भाग-५) मूनं०३०२/२०२४ भारतीय न्यास संहोता. २०२३ चे कलम. १०६(१)(२) २८१,३२४/४), (५), सह मोटार वाहन कायदा कलम १८४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंमलदार पोहेको मधुकर पवार चोपडा शहर पोस्टे यांनी गुन्हा दाखल केला तर पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे चोपडा शहर पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि जितेंद्र वल्टे चोपड़ा शहर पोस्टे. हे तपास करीत आहेत

No comments