Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नातवाने लिहिलेल आपल्या आजीसाठी अखेरच भावपूर्ण श्रद्धांजलीच पत्र

  नातवाने  लिहिलेल आपल्या आजीसाठी अखेरच  भावपूर्ण श्रद्धांजलीच  पत्र माझी आजी,या शब्दातला गोडवा काही औरच असतो आपल्या नातवंडांना मायेची फुंकर...

 नातवाने लिहिलेल आपल्या आजीसाठी अखेरच भावपूर्ण श्रद्धांजलीच पत्र



माझी आजी,या शब्दातला गोडवा काही औरच असतो आपल्या नातवंडांना मायेची फुंकर घालत लेकी कडे सर्वात जास्त लक्ष देते सर्व कुटुंब सोबत घेऊन आपल्या आयुष्याचा प्रवास वृध्दापकाळात समंजस पणात नेते ति आजी 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

प्रिय आजी (नानी)😪💐🙏🏻 प्रथम तर हृदय पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली. आज माझ्या गोड नम्र स्वभावाच्या आजीचा आयुष्याचा प्रवास कायम साठी संपला. कणखर आणि मेहनती माझी आजी  आपल्या गोड स्वभावाने अख्या समाजात भाऊबंदकीत  गावात नाव कमावून गेली. खरच या माउलींनी आपल्या देहाच सोन केल. आज आजीसाठी लीहताना मनात एवढ आहे की या माउलींचे मी माझ्या लीहण्याने सुद्धा वर्णन कमी पडेल एवढे आहे.आई वडील नंतर आपल्या पाकीट मधून चटकन पैसे देणारी गोड व्यक्ती म्हणजे आपली आजी. आमची आजी आम्हाला खूप आठवेल .😭 पण हे आजही सत्य आहे आणि उद्याही! जन्म आणि मृत्यू दोघ परमेश्वराचा हातात आहेत. आपली गोड व्यक्ती जेव्हा आपल्याला कायम साठी सोडून जाते याच दुःख मनाला न झेलण्यासारख असत. आजी खुप आठवशील 😪🙏🏻 miss you lot आजी 😭💐 भावपुर्ण श्रध्दांजली आजी खुप आठवशील !



🙏🏻मरावे परी कीर्ती रुपी उरावे. आजी आमच्यात तुझी आणि बाबांची कीर्ती नेहमी राहील आणि आम्ही ती जपू असे संस्कार आमच्या अंगी तुमच्या पासून आले आहेत हे मी गर्वाने सांगू शकेल... 🙏🏻 स्वर्गवासी. आमच्या आजीला परमेश्वर चरणी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. व देव पुण्य आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 💐🙏🏻




😭......शोकाकुल.श्री प्रशांत बोरसे.
नातू हातेड खु. ता चोपडा

No comments