adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बंधनबॅंक शाखा चोपडा येथिल खातेदाराची ऑनलाईन फसवणूक अज्ञाता विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

बंधनबॅंक शाखा चोपडा येथिल खातेदाराची ऑनलाईन फसवणूक अज्ञाता विरुद्ध   चोपडा ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- च...

बंधनबॅंक शाखा चोपडा येथिल खातेदाराची ऑनलाईन फसवणूक अज्ञाता विरुद्ध  चोपडा ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

अज्ञात आरोपीने बंधनबॅंक शाखा चोपडा येथील खातेदार बापुराव आधार पाटील वय ४७ धंदा शेती रा. चौगाव ता. चोपड़ा जि. जळगाव यांना त्यांचे मोबाईलवर OTP पाठवून ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की 

दि.२७/०६/२०२४ रोजी दुपारी १३.५७ वा.चे सुमारास वेळोवेळी फिर्यादीचे बंधनबॅंक शाखा चोपडा येथील खाते क्र.५०१७००१९४५१९१५८ यामधुन ऑनलाईन पध्दतीने OTP पाठवुन व Transaction id द्वारे सुमारे २,८१,४२४- रुपये काढून कोणीतरी अज्ञात इसमाने वरील रक्कम मला न विचारता माझे समंतीशिवाय  बंधनबॅंक शाखा चोपडा येथील खाते क्र.५०१७००१९४५९१५८ यामधुन ऑनलाईन पध्दतीने काढून माझी फसवणुक केली आहे याबाबतची फिर्यादीवरून वरुन अज्ञात इसमाविरूध्द चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन सो सो टी एन एस गु.र.न ११३/२०२४ भार्याव कलम ४२०, माहीती तंत्रज्ञान अधि. २००० चे कलम ६६(C), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला असून प्रत मा. न्यायालयात पाठविण्याची तजविज ठेवली  असून ईमेलदवारे वरिष्ठांना गुन्हयाचा स्पेशल रिपोर्ट पाठविण्यात आला   आहे. सदर गुन्हयाचा तपास स्वतःहा मा पोलीस निरीक्षक सो. कावेरी कमलाकर हे करीत आहे.

No comments