शिरपूर, गलंगी ते चोपड़ा जाणारे रोडवर गलंगी गावच्या हद्यीत पोलीस चौकी समोर गांजा सदृश्य वनस्पतीचे वाहतूक करताना एकास अटक चोपडा ग्रामीण प...
शिरपूर, गलंगी ते चोपड़ा जाणारे रोडवर गलंगी गावच्या हद्यीत पोलीस चौकी समोर गांजा सदृश्य वनस्पतीचे वाहतूक करताना एकास अटक
चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
दिनांक ०३/०७/२०२४ रोजी १७:०० वा चे सुमारास शिरपूर,गलंगी ते चोपड़ा जाणारे रोडवर गलंगी गावच्या हद्यीत पोलीस चौकी समोर कालुदास भूरसिंग पावरा (बारेला) वय ३५ वर्षे, रा. नागेश्वर मंदिर, ता. शिरपुर, जिल्हा धुळे हा स्वताचे आर्थीक फायद्यासाठी १)४६८००/- रु किमतीचा गांजा सदृश्य वनस्पतीचे प्रमाणित वजन ०८ किलो १०० ग्रॅम वजन असलेला त्याचा प्रती किलो भाव ६०००/- रुपये प्रमाणे असे एकूण ४८,६००/- रु.कि चा २) २०,०००/- एक निळे रंगाची बजाज प्लॅटिना मोटर सायकल तीचा आर टी ओ पासिंग क्रमांक एम पी ४६ एम ए १७४३ असा असलेला हा आढळून आला कालुदास भूरसिंग पावरा (बारेला) वय ३५ वर्षे,रा.नागेश्वर मंदिर,ता.शिरपुर,जिल्हा धुळे याने त्याचे ताब्यातील मोटर सायकल बजाज प्लॅटिना मोटर सायकल तीचा आर टी ओ पासिंग क्रमांक एम गो ४६ एम ए १७४३ मोटर सायकलवर शिरपुर,गलंगी ते चोपडा जाणारे रोडवर गलंगी गावच्या हद्यीत पोलीस चौकी समोर गांजा सद्य वनस्पतीचे वाहतुक करीत असताना व स्वताजवळ बाळगाताना मिळून आल्याने त्याचेविरुध्द पोकों/गजानन मच्छिंद्र पाटील चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन सो सो टो एन एस गु.र.म. ११४/२०२४ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० (ब) व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चोपडा ग्रामीण पो स्टे पोनि कावेरी कमलाकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शेषराव नितनवरे करत आहे
No comments