महिला पोलिसाला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न, विश्रामबाग पोलिसांची 'ड्रंक अँड ड्राइव्ह' कारवाई सुरू असताना हा धक्कादायक घटना नेशन ...
महिला पोलिसाला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न,
विश्रामबाग पोलिसांची 'ड्रंक अँड ड्राइव्ह' कारवाई सुरू असताना हा धक्कादायक घटना
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- पुणे
(संपादक:- हेमकांत गायकवाड )
पुणे येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या वाहनचालकाला अडवणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने लायटर चुकीच्या पद्धतीने धरल्याने तो पेटला नाही. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला, पोलिसांनी त्वरित चालकाला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय फकिरा साळवे (रा. पिंपरी चिंचवड, मूळगाव-जालना) असे आहे. विश्रामबाग पोलिसांची 'ड्रंक अँड ड्राइव्ह' कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला.गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ज्या काही घटना घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलिसांना वरिष्ठांकडून रात्रीच्या वेळी बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी देखील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. अशीच नाकाबंदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्यासमोर सुरू होती. त्यावेळीड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने एका गाडीला थांबवले, गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ड्रायव्हरने महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार समीर प्रकाश सावंत आणि पोलीस महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकार हे आपली ड्युटी करत होते. संजय साळवे दारू पिऊन दुचाकी चालवत असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली. मात्र आहे. शा कारवाई करू नये यासाठी त्याने जबरदस्तीने पोलिसांच्या हातातील मशीन ओढून घेतले. मात्र पोलिसांच्या राग मनात धरून आरोपीने सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर यांच्या अंगावर आणि स्वतःच्याही अंगावर पेट्रोल टाकले. लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र लायटर उलटा पकडला असल्याने आग पेटली नाही

No comments