सुरतमध्ये भीषण अपघात , सहा मजली इमारत कोसळली, १५ जण जखमी रात्रभर पासून ढिगार उपसण्याचे काम , फक्त सहा वर्ष जुनी बिल्डींग नेशन महाराष्ट्र...
सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली, १५ जण जखमी
रात्रभर पासून ढिगार उपसण्याचे काम, फक्त सहा वर्ष जुनी बिल्डींग
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- सुरत
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील सचिन पाली परिसरात आज दुपारी एक सहा मजली इमारत अचानक कोसळली आणि कोसळली. ज्यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या अपघातात १५ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.या घटनेत १५ जण जखमी झाले असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अहवालानुसार, इमारत कोसळण्याचे मुख्य कारण मुसळधार पाऊस असल्याचे सांगितले जात आहे. इमारत कोसळल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना मदत केली.सचिन परिसरात दुपारी तीनच्या सुमारास सहा मजली इमारत कोसळली. या इमारतीत राहणारे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले. या इमारतीच्या आतील ३० फ्लॅटपैकी काही लोक ४-५ फ्लॅटमध्ये राहत होते आणि उर्वरित फ्लॅट्स रिकाम्या होत्या. हा अपघात झाला तेव्हा इमारतीत राहणारे अनेक लोक कामावर गेले होते आणि रात्रीची शिफ्ट संपल्यानंतर अनेक लोक इमारतीत झोपले होते, जे अडकले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम काम करत आहेत, अजूनही ५-६ लोक इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकल्याचा अंदाज आहे ही इमारत २०१६ -१७ मध्ये बांधण्यात आली होती. यातील बहुतांश लोक या परिसरात असलेल्या कारखान्यांमध्ये राहत होते. या प्रकरणी स्थानिकांनी सांगितले की, ही इमारत अतिशय जीर्ण झाली असून प्रशासनाने ती खाली करण्याची नोटीसही दिली होती, मात्र त्यानंतरही लोक त्यात राहत होते. या अपघातानंतर स्थानिक लोकांनी काही जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस आणि इतर पथके बचावकार्य करत आहेत.
आवाज आला अन् पळापळा
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, बिल्डींग काही वर्ष जुनी होती. त्यानंतर त्यामध्ये दहा ते १५ कुटुंब राहत होते. शनिवारी अचानक मोठा आवाज आला आणि बिल्डींग पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. परिसरात सर्वत्र धुळीचे कण तयार झाले. नागरिकांची पळपळ सुरु झाली. संपूर्ण बिल्डींग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली. घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु झाले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली.
रात्रभर ढिगार उपसण्याचे काम
घटनेनंतर रात्रभर बिल्डींगचा ढिगारा काढण्याचे काम सुरु होते. ढिगाऱ्याखाली अजूनही खूप लोक अडकले असण्याची भीती आहे. घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
सहा वर्ष जुनी बिल्डींग
बिल्डींग २०१७ मध्ये बांधण्यात आली होती. केवळ सहा वर्षांत २०२४ मध्ये ती पडली. या बिल्डींगमध्ये मजुरी करणारे लोकच भाड्याने राहत होते. बिल्डींच्या पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. महानगरपालिकेने यापूर्वीच घरमालकांना नोटीस दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका महिलेस वाचवले
सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी रात्रभर ऑपरेशन सुरु होते. त्यावेळी एका महिलेची आवाज आली. अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी त्या महिलेस ढिगाऱ्याखालून सुरक्षित काढले. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

No comments