adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा वडती गावातील माता-भगिणींनी लाभ घ्यावा -श्री नंदलाल पाटील

  ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा वडती गावातील माता-भगिणींनी लाभ घ्यावा                               : -श्री नंदलाल पाट...

 ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा वडती गावातील माता-भगिणींनी लाभ घ्यावा                               :-श्री नंदलाल पाटील 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महाराष्ट्राच्या भाजप-शिवसेना राष्ट्रवादी युती सरकारच्या योजनेचा चोपडा मतदार संघातील वडती गावातील सर्व पात्र माता-भगिणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना कार्यकर्ते नंदलाल पाटील  यांनी केले आहे. राज्यातील श्रमबल पाहणी नुसार पुरुषांचे रोजगाराची टक्के ६० टक्केचे जवळपास तर स्त्रियांची केवळ २८ टक्के असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा शासनाच्या वतीने १५०० रूपयांची मदत पाठविण्यात येणार आहे. लाभार्थ्याचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाची अट नसून वडती बोरखेडा गावातील या योजनेस पात्र सर्व माता-भगिणींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बोरखेडा गावातील सार्वजनिक कार्यकर्ता नंदलाल पाटील  यांनी केले आहे.त्याचा वतीने वडती गावातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजनाचे फार्म निःशुल्क वाटप करण्यात आले आहेत.

No comments