मुख्य चौकात सी सी टिव्ही कॅमेरा लावण्यात यावा प्रहार जनशक्ती पक्षाची लोनवडी ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आंदो...
मुख्य चौकात सी सी टिव्ही कॅमेरा लावण्यात यावा प्रहार जनशक्ती पक्षाची लोनवडी ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी
अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- अमोल बावस्कार मलकापूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- तालुक्यातील ग्राम लोनवडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत येथे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद आहे की गावच्या वेशीतील मुख्य चौकात ग्रामपंचायत,हनुमान मंदिर, कोळी समाज भवन,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,पुढे बुद्ध विहार आहे.गावात जाणारा तो मुख्य रस्ता असून गावातील शुभ समारंभ,उत्सव,दिंडी सोहळे तेथेच होतात. त्या मुख्य चौका जवळून डांबरीकरण केलेला जांबुळधाबा ते निंभारी रस्ता असून दिवस रात्र अनोळखे नागरिक व वेगवेगळे वाहनांची वर्दळ चालूच असते गावच्या पुढील सुरक्षा,सावधानतेसाठी तसेच ग्रामपंचायतीला लागून व छत्रपती शिवाजी स्मारक मागील बाजूस मद्य प्राशनाच्या बॉटल, कचरा नेहमी पडलेला असतो तेथेच आसरा मातेचे मंदिर पण आहे या वरील सर्व विषयाचा व गावच्या पुढील संरक्षण सुरक्षा योग्यतेसाठी मुख्य चौकात सी सी टिव्ही कॅमेरा आवश्यक असून १५ दिवसात बसविण्यात यावा अन्यथा निवेदनाची पूर्तता न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदन देतेवेळी प्रहारचे तालुका सचिव अजाबराव वाघ,ग्राम शाखा अध्यक्ष आकाश बावस्कार,राहुल बावस्कार,राजेश बावस्कार, निलेश बावस्कार व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments