Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी ता.चोपडा येथे 'शिक्षण सप्ताह' उत्साहात साजरा करण्यात आला.

  स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी ता.चोपडा येथे ' शिक्षण सप्ताह' उत्साहात साजरा करण्यात आला.   ...

 स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी ता.चोपडा येथे 'शिक्षण सप्ताह' उत्साहात साजरा करण्यात आला.


 नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- प्रतिनिधी. रविंद्र कोळी 

(संपादक. :- हेमकांत गायकवाड)

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन  दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण   सप्ताह अंतर्गत... विविध नवोपक्रम राबवण्यात आले 

 दि. 22 जुलै सोमवार रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस विद्यालयाचे उपशिक्षक श्री जी डी निळे व श्री पी आर पाटील यांच्या मार्गदर्शकाखाली राबवण्यात आला. या दिवशी विविध अध्ययन, अध्यापन साहित्याची मांडणी करत विद्यार्थ्यांनी प्रदर्शन भरवले. दि.23 जुलै मंगळवार रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस उपशिक्षक श्री व्ही व्ही चौधरी व श्री आर.बी पाटील यांच्या मार्गदर्शकाखाली राबविला. या दिवशी गणिताच्या जादूच्या पेटीचा वापर करत विद्यार्थ्यांना विविध गणितीय सूत्रांची माहिती देण्यात आली. तसेच साक्षरता दिनानिमित्त गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन व आर्यभट्ट यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाचन करण्यात आले.दि.24 जुलै बुधवार रोजी क्रीडा दिवस श्री पी.जी पाटील व श्री पी आर पाटील यांनी राबवला. या दिवशी विविध पारंपरिक खेळ, मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दि. 25 जुलै गुरुवार रोजी सांस्कृतिक दिवस श्री बी वाय सानप व श्री एम डी पाटील यांनी राबविला. या दिवशी पेंटिंग डे सह अनोखा सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच दि. 26 जुलै शुक्रवार रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम श्री डी एस पाटील व श्री व्ही जी चव्हाण यांनी राबविला. वर्डी गावातील कुशल कारागीर श्री प्रल्हाद कांबळे व सौ.लताताई कांबळे यांनी बांबू पासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंची प्रत्यक्ष कार्यशाळा घेत सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच श्री आत्माराम कुंभार यांनी माती पासून विविध वस्तू बनवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वैज्ञानिकांच्या यशोगाथा, डिजिटल तंत्रज्ञान व मानवी जीवनाशी उपयोग यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

       दि. 27 जुलै शनिवार रोजी मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब व शालेय पोषण आहार उपक्रम  पर्यवेक्षक श्री आर बी साळुंखे व श्री एल एस पाटील यांनी राबविला . या दिवशी पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागरूकता व्हावी यासाठी विद्यालयामध्ये इको क्लब ची स्थापना करण्यात आली.

      शेवटी 28 जुलै रविवार रोजी रवीवार रोजी...... *समुदाय सहभाग दिवस* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

*शालेय परिपाठ*

विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा महत्त्वाकांशी उपक्रम आहे. या उपक्रमा विषयी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.

*विद्यांजली उपक्रम*

केंद्र शासनाच्या विद्यांजली या उपक्रमांतर्गत विद्यांजलीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विद्यालयाकडून *रॅलीचे ,पोस्टर मेकिंगचे* नियोजन करण्यात आले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध घोषणांद्वारे समाजातील विविध घटकांना विद्यांजली  उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

*तिथी भोजन*

समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी *तिथीभोजन* या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. या तिथी भोजनासाठी *सेवानिवृत्त वाहक यावल डेपो श्री. दगडू सुका निळे* हे अन्नदाते म्हणून लाभले. प्रभात फेरीनंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

विद्यालयाचे शालेय समिती सदस्य श्री. भरत शामराव चव्हाण यांनी तिथी भोजनाचे अन्नदाते श्री दगडू सुका निळे, त्यांचे चिरंजीव श्री घनश्याम दगडू निळे व त्यांच्या परिवाराचे विद्यालयातर्फे आभार मानले व शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .

अशा पद्धतीने शिक्षण सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना अनेक

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री. आर.बी.साळुंखे सर..... तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू -भगिनींचे सहकार्य लाभले.

No comments