Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात इको क्लबची स्थापना.

  पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात इको क्लबची स्थापना.   नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो. :- जळगाव  (संपादक  :-...

 पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात इको क्लबची स्थापना.


 नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो. :- जळगाव 

(संपादक  :- हेमकांत गायकवाड)

जळगाव येथील मानव सेवा मंडळ, जळगाव  प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे नवीन शैक्षणिक धोरणानुसार इ.1 लु ते 7वीच्या विद्यार्थ्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे.

      शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी,विद्यार्थ्याना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी असे आपल्या भाषणात शाळेचा मुख्याध्यापिका म्हणाले.


       म्हणून मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरामध्ये 'इको क्लब 'ची स्थापना करण्यात आली.

       या उपक्रमात पर्यावरणाचे धडे देण्याबरोबरच विद्यार्थी शाळेत व परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करणार आहे. या झाडांना विद्यार्थ्याची नाव,आईचे नाव व त्यांच्या वर्गाची नाव लिहुन झाडाजवळ पाटी लावली आहे.

      या नवीन शैक्षणिक धोरणानुसार ' शिक्षण सप्ताह' अंतर्गत शाळेमध्ये 'इको क्लब'ची स्थापना करण्यात आली आहे.

       या उपक्रमांतर्गत इको क्लब मिशन प्रमुख शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर ,इको क्लबचे समन्वयक सुनिल दाभाडे, इको क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष रितीक्षा पाटील व इ1ली ते 7 वीचे प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्याची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

      उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, कचरा कमी करणे, ऊर्जा संवर्धन व पाण्याची बचत करणे,प्लास्टिक वापर टाळणे ,वृक्षारोपण या संकल्पनावर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

      इको क्लबचा माध्यमातून इको क्लबचे समन्वयक,  उपक्रमशील शिक्षक,चित्रकार सुनिल दाभाडे यांनी मातीपासून सीड  बॉल बनवून त्यात पेरु,आंबा,चिंच ,निम,सिताफळ, जांभुळ अशा अनेक फळ झाडांचा बियांपासून 700-800 मातीचे सीड बॉल बनवून नदी किनारी, डोंगर भागात ,परिसरातील रस्ताचा किनारी टाकण्यात आले.


     या कार्यक्रम प्रसंगी शाळेचा मुख्याध्यापिका माया अंबटकर ,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील ,इको क्लबचे समन्वयक सुनिल दाभाडे ,इको क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष रितीक्षा पाटील, मनोजकुमार बावस्कर, योगिता घोलाणे व इको क्लब चे सदस्य उपस्थित होते.

     


 इको क्लब ची स्थापना झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया ,मानद सचिव विश्वनाथ जोशी व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी इको क्लब टिमचे अभिनंदन केले.

No comments