Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने दि.२७/०६/२०२४ रोजी मान्यनीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय महसुल मंत्री यांना निवेदन

  महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने दि.२७/०६/२०२४ रोजी मान्यनीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , माननीय महसुल मंत्री यांना निवेदन  नेशन महाराष...

 महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने दि.२७/०६/२०२४ रोजी मान्यनीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय महसुल मंत्री यांना निवेदन 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने दि.२७/०६/२०२४ रोजी मान्यनीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय महसुल मंत्री यांना दिलेल्या निवेदनास तालुका कोतवाल संघटनेचा पूर्ण पाठिंबा व सहभाग असले बाबत निवेदनाद्वारे म्हटले आहे 

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यांचे दि.२७/०६/२०२४ रोजी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. महसुलमंत्री यांना दिलेले निवेदन.उपरोक्त विषयास अनुसरुन सविनय निवेदन करण्यात येते की, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मुंबई मंत्रालय येथे दिलेल्या निवेदनास तालुका कोतवाल संघटना चोपडा चा पूर्ण पाठिंबा असून कोतवालांच्या सदरील मागण्या दिनांकः ३ जुलै २०२४ पर्यंत मंजूर न झाल्यास राज्यभरात कोतवाल संघटनेतर्फे करण्यात येणारे आंदोलनात तालुका कोतवाल संघटना. चोपडा 'चा पूर्ण संख्येने सहभाग असेल.तरी मेहरबान साहेबांना इमानेइतबारे २४ तास शासनाची व जनतेची सेवा करणाऱ्या कोतवालास आंदोलनाची वेळ येऊ न देता आमच्या मागण्याचा सहदयतेने सहानुभूती पूर्वक विचार करुन मागण्या मान्य करण्यात याव्यात.जेणेकरुन आम्हास आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करून किमान समाधानकारक जीवन जगता येईल ही कळकळीची विनंती. 

अशा आहेत संघटनेच्या प्रमुख "मागण्या" 

१) राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करण्या बाबत. २) तलाठी व लिपीक पदामध्ये २५% कोटा राखीव ठेवण्यात बाबत. ३) सेवा निवृत्त कोतवाल यांना पेन्शन व अनुकंप लागू करण्या बाबत. ४) कोतवाल पदाचे नाव बदलवून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक करणे बाबत. ५) सेवा निवृत्त कोतवाल यांना ३०० दिवसाचे रजा रोखीकरण मिळणे बाबत. ६) कोतवालमधून शिपाई पदावर देण्यात येणारा ४०% कौटा बाढवून तो ८०% करावा. ७) ८ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णयानुसार अटल पेन्शन बाबत सुधारीत जी.आर. काढणे बाबत.








No comments