मजरे हिंगोणा येथिल स्मशान भूमी मागील कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत ग्रामपंचायत मजरे हिंगोणा येथिल ग्रामसेवक यांना ग्रामस्...
मजरे हिंगोणा येथिल स्मशान भूमी मागील कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
ग्रामपंचायत मजरे हिंगोणा येथिल ग्रामसेवक यांना ग्रामस्थांनी दिले निवेदन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणा येथिल स्मशान भूमी मागील कित्येक वर्षांपासून ना दुरुस्त अवस्थेत असुन येथे कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा या ठिकाणी नाही अश्यातच पावसाळ्यात अंतविधी करणे अंत्यत कठीण होते सरपंच कल्पनाबाई पाटील उपसरपंच नंदकिशोर सांगोरे यांना मौखिक व लेखी अर्ज, मागणी करून देखील काना डोळा करण्यात आला स्मशान भूमीत चिखलातून पाय तुडवित घाणीतून गुडघ्या बरोबर पाण्यातुन ठिकाणापर्यंत पोहचणे अशक्य होतं आहे तर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आणण्यासाठी गावातील तरुणांनी ग्रामसेवक कोळी भाऊसाहेब यांच्या कडे स्मशान भूमी व तिथं पर्यंत पोहोचण्यासाठी काँक्रीटचा रस्ता होणे साठी निवेदन देण्यात आले त्यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

No comments