हातेड खु - घोडगाव रस्त्याचे कधी उघडणार भाग्य रस्ता देत का कुणी रस्ता , हातेड खु सह परिसरातिल नागरिकांचा सवाल नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो...
हातेड खु - घोडगाव रस्त्याचे कधी उघडणार भाग्य
रस्ता देत का कुणी रस्ता ,हातेड खु सह परिसरातिल नागरिकांचा सवाल
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शामसुंदर सोनवणे
(संपादक हेमकांत गायकवाड)
सध्या रस्त्याची कामे चहुकडे जोरदार सुरू असुन आता एकही गाव असे नसेल कि जेथे नवीन रस्ता तयार करण्यात आला नसेल परंतु एक रस्ता असा आहे की पुर्वी या रस्त्यावरून भरपूर प्रमाणात वाहतूक सुरू होती वेळोदे,वढोदा ,विटनेर,अजंटिसिम,इ. अश्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ हातेड खु ,चहार्डी या मार्गाने सुरू होती परंतु हा रस्ता हळूहळू दुर्लक्षीत होत गेला असा दुर्लक्षित झाली कि याकडे कुणाचे लक्षच गेलं नाही तरी आता परिसरातिल नागरिकांकडून आता जोरदार मागणी केली जात आहे या बाबत अधिक माहिती अशी की
गेल्या बऱ्याच वर्षांपासून ह्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन हातेड खु !! पासुन दोन तिन वर्षांपूर्वी फक्त १कि.मी बनविण्यात आला तरी हातेड खु - घोडगाव रस्त्याचे अंतर किमान ७ कि.मी.चे असुन या रस्त्यावरून नेहमी शेती कडे जाणारी वर्दळ सुरू असते तर घोडगाव कडून ही किमान २कि.मी च्या आसपास हा रस्ता बनविण्यात आला असून मध्येच हा रस्ता का नाही बनविला कि कुठे गायब झालाय अशी चर्चा सुरू आहे तर ह्या रस्त्याच्या आजूबाजूला तर कुठे कुठे मध्यभागी काटेरी झुडपे पहावयास मिळतात यामुळे
या रस्त्यावरून चालणे ही कठीण झाले आहे तर ह्या रस्त्यावरून आधी भरपूर प्रमाणात वाहतूक होत होती हातेड खु येथुन घोडगाव येथे शेती च्या कामानिमित्त जाण्यासाठी गलंगी वेळोदे ह्या मार्गाने फिरून जावे लागते हे अंतर किमान १२कि.मी.चे असुन हा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे तरी संबंधित विभागाने ह्या रस्त्याच्या मागणीवर लक्ष घालावे




No comments