Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपरिषदेमार्फत मोकाट गुरे पकडणेची धडक मोहिम

  चोपडा नगरपरिषदेमार्फत मोकाट गुरे पकडणेची धडक मोहिम मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांना, नागरिकांना रस्त्याने वापरास अडचणी होत असुन मोकाट जनाव...

 चोपडा नगरपरिषदेमार्फत मोकाट गुरे पकडणेची धडक मोहिम


मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांना, नागरिकांना रस्त्याने वापरास अडचणी होत असुन मोकाट जनावरांमुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड )

 सध्या चोपडा शहरात रहदारीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा हौदोस मोठ्या प्रमाणात वाढला असुन काही नागरिकांनी त्यांच्या मालकिची गुरे, गायी, म्हशी, बकऱ्या, डुकरे इ. प्रकारची जनावरे गावात मोकाट सोडुन दिलेली आहेत. तर  मोकाट जनावरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांना, नागरिकांना रस्त्याने वापरास अडचणी होत असुन मोकाट जनावरांमुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. 



त्याअनुषंगाने चोपडा नगरपरिषदेमार्फत न.पा. कर्मचारी यांचेकडून दि.०४/०७/२०२४ पासुन शहरात मोकाट फिरणारे गुरे / जनावरे पकडुन कोंडवाड्यात टाकणेची कार्यवाही सुरु आहे. तसेच त्यांचे मालकांकडून दंड वसुल करुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेचे काम सुरु आहे. तरी नागरिकांनी त्यांच्या मालकीचे जनावरे मोकाट न सोडता आपआपल्या गोठ्यात किंवा गावाबाहेर बांधुन ठेवावी अन्यथा नगरपरिषदेमार्फत मोकाट जनावरे पकडून गो-शाळेत पाठविणेत येतील व जनावरे मालकांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी शहरातील नागरीकांना सुचित केलेले आहे.



No comments