adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ट्रॅकवर मातीचा गाळ साचल्याने मालगाडीची चाकं थांबली,मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

ट्रॅकवर मातीचा गाळ साचल्याने मालगाडीची चाकं थांबली, मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम  काल्पनिक चित्र    नेशन महाराष्ट्र न्यूज ब्य...

ट्रॅकवर मातीचा गाळ साचल्याने मालगाडीची चाकं थांबली,मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम 

काल्पनिक चित्र 

 नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेला मोठा फटका बसला आहे. सुरत- भुसावळ रेल्वे सेवा ठप्प झाली असून कोळदा-चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरुन पाणी वाहत असल्याने रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या स्टेशनवर थांबून आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले. रेल्वेमार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू रेल्वेगाडी या मातीमध्ये रुतली. त्यामुळे सुरत-नंदुरबार रेल्वेसेवा विस्कळीत झाली.चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली रेल्वे मार्गाला संरक्षक भिंत  नसल्याने  पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून आले होते. पाण्याबरोबर मातीचा ढिगारादेखील वाहून आला होता नंदुरबार मधील डांग परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे रूळावर माती वाहून आल्याने मालगाडीची चाकं जागीच थांबली आहे. तर आता रेल्वे रूळावर वाहून आलेल्या मातीचा ढिगारा, गाळ बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. संपूर्णपणे रेल्वे रूळावरून हा मातीचा ढिगारा बाजूला केल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत होणार असल्याचे चित्र दिसतेय. मात्र या कामाला किती वेळ लागेल याचा अंदाज अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही, तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेला मोठा फटका बसला आहे. सुरत- भुसावळ रेल्वे सेवा ठप्प झाली असून कोळदा-चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरुन पाणी वाहत असल्याने रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या स्टेशनवर थांबून आहेत. लांब पल्याच्या गाड्या अडकून पडल्याने प्रवाशांचेप्रचंड हाल होतायचं. रेल्वे सेवा कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाकडून कुठलीही सूचना अद्याप देण्यात आलेली नाही.

No comments