मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरांचे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शिक्षण सप्ताह निमित्त सीड्स मातीपासून चेंडू तयार करुन साजरा...
मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरांचे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शिक्षण सप्ताह निमित्त सीड्स मातीपासून चेंडू तयार करुन साजरा.
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जागतिक तापमान खुप प्रमाणात वाढत असताना एका बाजूने झाडांची कमतरता भासत आहे याचा विचार प्रत्येकांनी रुन कोणत्याही मार्गाने वक्षारोपण उपक्रमा अंतर्गत व संवर्धन करणे गरजेचे बनले आहे अशी माहिती मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना दिले.
याचा विचार करुन मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिराचे विद्यार्थ्यांनी व उपक्रमशील शिक्षक सुनिल दाभाडे यांनी शिक्षण सप्ताह निमित्ताने वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत आगळावेगळा पध्दतीने सीड्स चेंडू विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात आले. यामध्ये आपण जी फळे खातो त्याच्या बिया इतरत्र न टाकता त्यांचा संचय करून त्या सुकवून घेऊन नंतर माती व शेणखत किंवा गांडुळ खत एकत्र करून त्यामध्ये सुकलेल्या बिया एकत्र करून लाडू सारख्या आकाराचे सीड्स मातीचे चेंडू तयार करुन घेतले.
यात आंबा ,चिंच,निम,पेरु,वड,जांभुळ, अशा विविध फळ झाडांचे सीड्स चेंडू तयार करुन विद्यार्थ्यांनी व शिक्षक सुनिल दाभाडे यांनी नदी किनारीवर ,माळरानात याठिकाणी टाकले आहे.
अशा प्रकारे सीड्स मातीचे चेंडू तयार करुन निसर्गात वृक्षांची लागवड करता येईल यामुळे जमिनीची धुप थांबण्याचे एक प्रकारे प्रयत्न होईल.
इको क्लबचे समन्वयक ,उपक्रमशील शिक्षक ,चित्रकार सुनिल दाभाडे यांनी इ.1 ली ते 7 वी चे विद्यार्थ्यांना सीड्स चेंडू कसे बनवायचे व त्याचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष 600 ते 700 सीड्स चेंडू बनवून घेतले.
इको क्लब मिशन लाईफचे प्रमुख ,मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,लहान मुलांचे बालपणापासून पर्यावरण जागृती होणे गरजेचे आहे .
या कार्यक्रम प्रसंगी इको क्लबचे अध्यक्ष रितीक्षा पाटील तसेच इको क्लब मिशन लाईफचे सर्व विद्यार्थी सदस्य, सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.




No comments