संत सेनाजी महाराज यांचे जीवन चरित्र व अभंग गाथा समाजातील प्रत्येक बांधवांनी वाचली पाहिजे- श्री. रामचंद्र येशी नेशन महाराष्ट्र न्यूज ब...
संत सेनाजी महाराज यांचे जीवन चरित्र व अभंग गाथा समाजातील प्रत्येक बांधवांनी वाचली पाहिजे- श्री. रामचंद्र येशी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शिरपूर/शामसुंदर सोनवणे हातेड
संपादक :- हेमकांत गायकवाड
ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी गाथा आपण अध्यात्मिकतेसाठी आपल्या प्रत्येक घराघरात जतन करून ठेवतो. त्याचप्रमाणे आपल्या नाभिक समाजातील आराध्यदैवत संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचे जीवन चरित्र व अभंग गाथा प्रकाशित करण्यात आली आहे.
आपल्या धुळे जिल्ह्यात नाभिक समाजातील सर्वच महापुरुषांच्या इतिहास सांगणारा व जपणारा आणि भारत स्वातंत्र्यपूर्वीच्या इतिहास समाजात होवून गेलेले पूर्वीचे महापुरुष यांचा इतिहास सांभाळून ठेवणारा आपल्या नाभिक समाजातील धुळे येथील ज्ञानवंत, अभ्यासू व्यक्तिमत्व लेखक या सर्व गोष्टींच्या पाठपुरावा करून स्वलिखित महापुरुषांबद्दल संपूर्ण लेखाजोखा सांगणारा नाभिक समाजात जन्माला आलेला माणिक मोती दादासाहेब मा.श्री.भगवान चित्ते यांना मानाच्या साष्टांग दंडवत प्रणाम करतो.
संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचे जीवन चरित्र व अभंग गाथा समाजातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावी असा दादासाहेब मा.श्री.भगवान चित्ते मानस आहे. आपण आपल्या सर्वांच्या घरा घरात आपले आराध्य दैवत राष्ट्रसंत शिरोमणी सेनाजी महाराज यांची अभंग गाथा ठेवलीच पाहिजे. हे माझे स्वतःचे मत आहे. तरी माझी समाज बाधवांना आग्रहाची विनंती आहे की, आपण हि गाथा आर्वजून घ्यावी. ह्या गाथेमध्ये संत शिरोमणी सेनाजी महाराज यांचे अनेक दुर्मिळ अभंग आहेत. ज्या अभंगाच्याद्वारे संपूर्ण समाजाचे उद्बोधन होते. अशी ही गाथा आपल्या संपूर्ण नाभिक समाज बंधुनी घ्यावी असे मी आपणास याद्वारे आवाहन नाभिक करीत आहे. या गाथेची मुळ किमंत 350 /- असून समाज बांधवांसाठी सवलतीच्या दरात 250 /- रुपयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानिमित्ताने आपणास आपल्या समाजातील महापुरुषांचा इतिहास घर बसल्या वाचून समजेल व आपल्या ज्ञानात भर पडेल. म्हणून हि गाथा आपण आपल्या प्रत्येकाचा घराघरात ठेवायलाच हवी.
माझा समाज माझा अभिमान म्हणून जसे आपण नाभिक आहोत तसे आपण आपल्या घरात संत सेनाजी महाराज यांचा फोटो व गाथा ठेवली पाहिजे. कृपया ज्या समाज बांधवांना ही गाथा हवी असेल त्यांनी राज मेन्स पार्लर करवंद नाका या ठिकाणी संपर्क साधून ही गाथा घेवू शकतात. या करिता खालील नंबर वर संपर्क साधावा.
श्री. रामचंद्र येशी
8261968982
श्री.विकास सेन
8888678933
श्री.रामचंद्र पवार साहेब
9921441095
श्री.गोपाल वरसाळे सर
8999604179

No comments