हातेड खु येथे बिबट्या सदृश हिस्र प्राण्यांने एका गोऱ्हयावर (गायच्या बछड्यावर ) हल्ला करून केले ठार नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शामसुं...
हातेड खु येथे बिबट्या सदृश हिस्र प्राण्यांने एका गोऱ्हयावर (गायच्या बछड्यावर ) हल्ला करून केले ठार
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शामसुंदर सोनवणे
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
हातेड खु येथे दि २५/७/२०२४ च्या रात्री बिबट्या सदृश हिस्र प्राण्यांने एका गोऱ्हयावर (गायच्या बछड्यावर ) हल्ला करून ठार केले असून याबाबत अधिक माहिती अशी की
हातेड खु येथिल रहिवासी पशू पालक शेतकरी श्री सुरेश जगन्नाथ कोळी यांच्या गोऱ्हयावर बिबट्या सदृश हिस्र प्राण्यांने हल्ला करून ठार केले तर वनविभागाने घटनास्थळी भेट दिली असुन संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला पंचनामा करते वेळी वनविभागाचे अधिकारी जे. पि. सुर्यवंशी व त्यांची टिम उपस्थित होते तर हातेड खु चे तलाठी प्रशांत पवार, पोलिस पाटील सुनील सोनवणे इ.ग्रामस्थ उपस्थित होते
तरी यावेळी सर्व ग्रामस्थ व पशू पालकांना सावधान करण्यात येते की. काल रात्रीआपल्या हातेड खुर्द येथील पशू पालक शेतकरी श्री सुरेश जगन्नाथ कोळी यांच्या गोऱ्हयावर बिबट सदृश हिस्र प्राण्यांने हल्ला करून ठार केले आहे तरी कृपया सर्वानी आपली व आपल्या पशूंची काळजी घ्यावी. जो पर्यंत सदरील बिबट्या सदृश हिंस्र प्राण्यांनी सापडत नाही तोपर्यंत प्रत्येक पशुपालक यांनी आपापल्या खळ्याजवळ पशु असतिल अशा जागे जवळ जुनी टायर हि जाळावित जेणेकरून संबंधित हिंस्र प्राण्यांनी पशुवर हल्ला करणार नाहीत असे आव्हान वनखाते, मार्फत करण्यात आले आहे





No comments