adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पैसे मागण्याच्या तगाद्याने मित्रानेच मित्राची केली निघृण हत्या

पैसे मागण्याच्या तगाद्याने मित्रानेच मित्राची केली निघृण हत्या  पैसे मागण्याच्या तगाद्याने जिगरी मित्राला जंगलात संपवलं  नेशन महाराष्ट्र न...

पैसे मागण्याच्या तगाद्याने मित्रानेच मित्राची केली निघृण हत्या 

पैसे मागण्याच्या तगाद्याने जिगरी मित्राला जंगलात संपवलं 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुक्ताईनगर

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

मित्राच्या लग्नासाठी उसनवारीने पैसे दिले होते, परत मागण्याच्या तगाद्याने जिगरी मित्राला   जंगलात संपवलं अशी दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे घडली असून याबाबत अधिक माहिती अशी की नितीन दिल्लीवरून रेल्वेची अप्रेंटिसशिप आटपून दुपारी गुरुवारी घरी आला होता. चार वाजता जेवण केलं आणि शेजारीच राहणारा मित्र वैभव याच्यासोबत मोपेडवर मुक्ताईनगर येथे ते दोघे निघाले. मात्र, तिथे जाताच एक अनर्थ घडला. पैसे मागण्याच्या तगाद्याने मित्रानेच मित्राची निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, आसोदा रोड जळगाव) असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितीन गेल्या एक वर्षापासून दिल्ली येथे रेल्वेच्या अप्रेंटिसशिपसाठी मित्रासह राहत होता. गुरुवारी नुकताच तो दुपारी घरी आला आणि चार वाजता घरी जेवण केले. त्यानंतर शेजारी राहणारा वैभव कोळी (वय २६) याच्यासोबत मोपेडवर मुक्ताईनगर येथे निघाला. नितीन आणि वैभव हे गेल्या पाच वर्षापासून चांगले मित्र होते. काही महिन्यापूर्वी वैभवच्या लग्नासाठी नितीनने त्याच्या जवळच्या आणि वडिलांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. पैसे परत मिळावे म्हणून नितीन वारंवार त्याला पैशाची मागणी करत होता. रात्री आठ वाजेपर्यंत नितीनचा भाऊ सचिन याने त्याच्या मोबाईलवर फोन केला आणि शेवटची दोघं भावांची बोलणी झाली, तेव्हा नितीन याने सांगितले की "मी थोड्या वेळात घरी परत येईल". त्यानंतर फार वेळ झाल्याने पुन्हा नितीनच्या मोठ्या भावाने फोन केला, रिंग जात होती मात्र फोन कोणीही उचलत नव्हते. वैभवसोबत असल्याने सचिन याने वैभवला कॉल केला तेव्हा साडेनऊ वाजले होते. वैभवच्या मोबाईलवर फोन केला असता तेव्हा त्याने सांगितले की आम्ही मुक्ताईनगर येथील कुऱ्हा गावाकडे जाणाऱ्या डोलारखेडा रोडवर असलेल्या जंगलाच्या रस्त्याने स्कुटीने आलो होतो. तेथे संशयित संतोष भागवत कठोरे (रा. बोदवड) याने जंगलात एका ठिकाणी थांबून नितीन याच्यावर चाकूने दोन ते तीन वार केले, म्हणून मी तेथून पळून आलो असल्याचे वैभव याने सांगितले. नितीनचा मोठा भाऊ आणि त्याचे मित्र शोधण्यासाठी जळगाव येथून मुक्ताईनगर येथे निघाले. रात्रीची वेळ असल्याने मदतीसाठी भुसावळ येथील काहींना सोबत घेतले. तेथून मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे येऊन पोलिसांना सोबत घेऊन वैभव सांगतो त्याप्रमाणे घटनास्थळी निघाले. ते सर्व घटनास्थळी पोहोचले असता तेथे रक्ताच्या थारोळ्यात नितीनला पाहताच त्याचा घातपात झाला असल्याचा संशय आला. या संशयामुळे जंगलात आजूबाजूला आणि जवळच असलेल्या पूर्णा नदीच्या काठावर फिर्यादी आणि पोलीस यांनी शोध घेतला. घटनास्थळापासून काही अंतरावर पुन्हा नदीच्या पुलावर असलेल्या कठड्याजवळ देखील रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रात पोलीस स्टाफ आणि पोलिसांनी बोलवलेले गोताखोर यांनी मयत नितीन पाटील याचा शोध घेतला. तब्बल ९ तासांनी नितीनचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याच्या गळ्यावर आणि छातीवर धारदार चाकूने वार केले असल्याचं आढळून आलं. दरम्यान, सचिन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वैभव कोळी आणि संतोष कठोरे यांनी नितीनला पैशांच्या कारणावरुन मारहाण करुन तसेच त्याची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली असल्याची तक्रार केली आहे. मोठ्या नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास निरीक्षक नागेश मोहिते हे करत आहेत.

No comments