``स्वाराती`` रुग्णालयातील रक्तासाठी आर्थिक लुट तात्काळ बंद करा ,,,, ऋषिकेश शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने अधिष्ठाता यांन...
``स्वाराती``रुग्णालयातील रक्तासाठी आर्थिक लुट तात्काळ बंद करा,,,, ऋषिकेश शिंदे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने अधिष्ठाता यांना निवेदन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- अंबाजोगाई प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
आशिया खंडातील पहिले ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळखले जाणारे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील सर्व सामान्य रुग्णांची व नातेवाईकांची रक्तासाठी आर्थिक लुट होत असल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या वतीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील रुग्णांची रक्तासाठी आर्थिक लुटबाबत अधिष्ठाता डॉ.धपाटे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे
``स्वाराती`` या रुग्णालयात पर राज्यातील विविध जिल्ह्यांतुन , ग्रामीण भागातुन दररोज असंख्य रुग्ण अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आजार बरे होण्यासाठी उपचारासाठी दाखल होत असतात येथे येणाऱ्या रुग्ण बहुतांश गरीब कुटुंबातील असतात ज्यांची आर्थिक स्थिती खाजगी हाॅस्पिटल मध्ये औषधोपचार घेण्याइतपत नसते.
उदा.गर्भवती महिला
गर्भवती महिलेला प्रसृतीसाठी खाजगी रुग्णालयात बराच खर्च करावा लागत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शासकिय रुग्णालय शिवाय पर्याय नसतो.
परंतु रुग्णालयात लुट म्हणजे लुट शासकिय असो किंवा खाजगी रुग्णालय ,,,असाच प्रकार स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडुन आर्थिक लुट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सविस्तर माहिती अशी की, रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रसृतीसाठी रक्ताची गरज असता़ना येथील डाॅक्टरांनी रुग्णालय परिसरातील शासकिय रक्तपेढीत न पाठवता रुग्णांच्या नातेवाइकांना खाजगी रक्तपेढीत रक्त खरेदीची सक्ती डाॅक्टरांकडुन करण्यात येत आहे.
शासकिय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याचे गरिब रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात लिहुन दिले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे
रिप्लेसमेंटच्या नावाखाली रक्त देण्यासाठी रुग्णांची अडवणुक करीत असल्याचा दावा समोर आला आहे.रक्तदात्यानाही रक्तासाठी रिप्लेसमेंटची अट घातली जाते त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना खाजगी रक्तपेढीतुन १५५०/- रुपये इतकी रक्कमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे
टेस्टिंगसाठी येणारा खर्च घेणे अपेक्षित असताना देखील खाजगी रक्तपेढीवाले १५५०/- रुपये प्रति युनिट अशा दराने विक्री करुन येथील डाॅक्टरांच्या संगनमताने रुग्णाच्या नातेवाईकांकडुन आर्थिक लुट करतात तर सामान्य रुग्णांचा काय हाल होत असतील असा प्रश्न निर्माण होत आहे
वरिल प्रकारा बाबत सर्व सामान्य रुग्णांची आर्थिक लुट तात्काळ बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए) च्या वतीने अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ धपाटे यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपक भाऊ निकाळजे साहेब ,पक्षाचे महासचिव मा.मनोहरलाल पाटील साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बाळासाहेब पवार साहेब,महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण,महिला उपाध्यक्षा प्रियदर्शनी ताई निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली, आदेशानुसार महिला आघाडीच्या मराठवाडा संपर्क प्रमुख सौ.आम्रपाली गजेशिव मॅडम, मराठवाडा संघटक संजय भाऊ तेलंग , मराठवाडा संपर्क प्रमुख प्रकाश वेदपाठक सर,बीड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे ,युवा जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश शिंदे, उपाध्यक्ष चंद्रकांत बनसोडे ,महिला युवा जिल्हा अध्यक्ष अलका सालुंके, उपाध्यक्ष मदिना मुस्तफा शेख, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष नासेर शेख, अंबाजोगाई शहर अध्यक्ष प्रमोद गाढे,युवा तालुका अध्यक्ष अजय अगडे,युवा शहर अध्यक्ष अमित तांगडे,युवा शहर उपाध्यक्ष शुभम काळुके इत्यादीच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे.

No comments