त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी संघटनेच्या वतीने घोपडा उपजिल्हा रुग्णालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात ...
त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी संघटनेच्या वतीने घोपडा उपजिल्हा रुग्णालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल
निळे निशाण सामाजिक संघटना यांचे वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा /जळगाव
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा उप जिल्हा रुग्णालय व यावल ग्रामिण रुग्णालय येथील डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे झालेल्या मृत्युची चौकशी तसेच गर्भवती महिलांच्या जिवीताशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी व रुग्णांना सुरक्षा प्रदान करावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की
उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी चोपडा येथील रहिवासी पुंडलिक महाजन यांना सर्पदंश झाल्याने उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्या कारणाने एक तास मृत्यूशी झुंज देत असताना पुंडलिक महाजन त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर शवविच्छेदन करण्यात आले पुंडलिक महाजन हे कुटुंबातील प्रमुख व कमावते व्यक्ती असल्याने त्यांचे कुटुंब निराधार झाले कुटुंबाचा आक्रोश बघून अनेकांच्या हृदयाला वेदना झाल्या परंतु रुग्णालयातील भावना बोथट झालेले डॉक्टर उपेक्षा डोळ्यांनी सर्व बघत होते डॉक्टरांनी पुंडलिक महाजनांच्या कुटुंबाला धीर देण्याऐवजी शव विच्चोदन झालेले प्रेत कुटुंबाच्या ताब्यात देण्याकरिता १२००/- रुपयांची मागणी केली तेव्हा मात्र उपस्थित जनसमुदायाचा संताप अनावर झाल्यामुळे रुग्णालयाच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले काही वेळातच पोलीस प्रशासनाने जनसमुदायाला समज घालून मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला. डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे पुंडलिक महाजन यांचा मृत्यू झालेला असून डॉक्टरांनी केलेली चूक मान्य करण्याच्या ऐवजी त्यांच्या खाजगी पंटरांच्या माध्यमातून प्रेत ताब्यात देण्याचे पैसे नातेवाईकांकडून मागत आहे हा माणुसकीला काळीमा फासणारा विषय आहे म्हणून आपण चोपडा उपजिल्हा रुग्णालय पेथे ज्या डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे पुंडलिक महाजन यांचा मृत्यू झाला त्यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करून पुंडलिक महाजन यांच्या निराधार कुटुंबाला आरोग्य विभाग यांच्या कडून आर्थिक मदत द्यावी, गेल्या आठवड्यात चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे एक आदिवासी गर्भवती महिला प्रसूती करिता आली असता डॉक्टरांनी त्या महिलेला सिजर करण्याची आवश्यकता असल्याने तिला तुम्ही जळगाव येथे घेऊन जा असे नातेवाईकांना सांगितले त्या गर्भवती महिलेला मोठ्या प्रमाणात प्रसुती वेदना होत असल्याने त्या महिलेच्या नातेवाईकांनी चोपडा शहरातील एक आदिवासी डॉक्टर डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या खाजगी रुग्णालयात घेऊन गेले त्या गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ३० मिनीटात ती महिला नैसर्गिकरित्या प्रसूत झाली व डॉक्टर बारेला यांनी त्या महिलेला जीवनदान दिले ज्या महिलेला उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत्यूच्या मार्गावर सोडून आपल्या कर्तव्यात कसूर केलेलं होत त्यांच्या या बेजबाबदार कृत्याच्या बातम्या दुस-याच दिवशी प्रसिद्ध झाल्या म्हणून आपण त्या डॉक्टरां वर कारवाई करून कायमस्वरूपी सेवामुक्त करावे जेणेकरून रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिला यांच्यावर योग्य उपचार होऊन त्यांच्या जिवितास हानी होणार नाही तर यावल ग्रामीण रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची हेळसांड होत असून गर्भवती महिलांच्या जीवित खेळ होत आहे तरी आपण यावल ग्रामीण रुग्णालय येथे वैयक्तिक लक्ष केंद्रित करून रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व अधीक्षक तसेच श्री रोग तज्ञ व बालरोग तज्ञ यांची तात्काळ नेमणूक करावी आम्ही निवेदनात नमूद केलेल्या मागण्या या जनहिताच्या असून गोरगरीब सर्वसामान्य व्यक्ति करता अत्यावश्यक आहेत आपण येत्या दोन दिवसात चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी व मयत पुंडलिक महाजन यांच्या कुंटुंबाला आर्थिक मदत द्यावी अन्यथा दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी संघटनेच्या वतीने घोपडा उपजिल्हा रुग्णालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तसेच १२ जुलै २०२४ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालया समोर सुद्धा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन केले जाईल अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे

No comments