उपजिल्हा रूग्णालय चोपडा येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारींना आम आदमी पार्टी समर्थन नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संपादक :- हे...
उपजिल्हा रूग्णालय चोपडा येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारींना आम आदमी पार्टी समर्थन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
उपजिल्हा रुग्णालय चोपडा सध्या खुपच चर्चेचा विषय ठरले असुन जिती संघटना आपापल्या परीने आपले समाजकार्य चोख पार पाडतांना दिसत असुन आता उपजिल्हा रूग्णालय चोपडा यांचे समर्थन करीत आम आदमी पार्टी चोपडा यांनी नुकतेच वैद्यकीय अधिकारी चोपडा यांना त्यांच्या पार्टीचे समर्थनाचे निवेदन सादर केले आहे या निवेदनात त्यांनी उपजिल्हा रूग्णालय येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे गोर-गरीब रुग्णांना त्याचा चांगलाच फायदा होत आहे. जिल्हा पातळीवरील वरीष्ठांना विनंती की, सार्वजनिक जीवनात काम करत असतांना सामाजिक कार्यकर्ते दुखावले गेल्यास त्यांनी केलेल्या तक्रारीवरून कोणास वेठीस धरणे हे योग्य नाही. मात्र योग्य ती चौकशी करून मार्ग काढावा.
चोपडा येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समर्थनार्थ चोपडा तालुका आम आदमी पार्टी सदैव समर्थनास उभी राहील. असे नमुद केले आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

No comments