चोपडा आगारात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न संदिप साळी मित्र परिवार अमळनेर आगार व पाटील हाॅस्पीटल चोपडा यांच्या विद्यमाने कर्मचाऱ्यांस...
चोपडा आगारात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
संदिप साळी मित्र परिवार अमळनेर आगार व पाटील हाॅस्पीटल चोपडा यांच्या विद्यमाने कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चोपडा आगारात संदिप साळी मित्र परिवार अमळनेर आगार व पाटील हाॅस्पीटल चोपडा यांच्या विद्यमाने गुरूपौर्णिमा निमित्ताने दिनांक २१ जुलै रोजी कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, शिबीराचे उद्घाटन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, शिबीरात ब्लड प्रेशर,ब्लड शुगर, मधुमेह सह विविध आजारांची तपासणी डॉ शरद एम पाटील (एम डी मेडीसीन) डॉ कैलास वाघ,कु. संगिता पावरा यांनी केली. याप्रसंगी संदिप साडी,स का अ सिध्दार्थ चंदनकर,वाहतुक निरीक्षक नितिन सोनवणे, उमाकांत कोळी,अतुल पाटील, देवराम कोळी,सी पी कोळी,नाना बाविस्कर भगवान नायदे, दिपक पाटील यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.शिबीरात कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

No comments