adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या

  अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-अमळनेर (संपादक :-हेमकांत गायकवाड) अमळनेर...

 अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-अमळनेर

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र यशवंत पाटील (वय ४९) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत असे की, रवींद्र पाटील हे जवखेडा येथे परिवारासह राहत असून ते शेती काम करून उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दि. १० जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मांडळ रस्त्यावरील महादेव मंदिरामधील लोखंडी अँगलला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांचा मुलगा गोपी याने त्याचे काका गोकुळ धोंडू पाटील यांना कळवले.गावाचे पोलीस पाटील प्रकाश सुकदेव कुऱ्हाडे यांच्यासह नागरिकांनी रवींद्र पाटील यांना अमळनेर ग्रामिण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गोकुळ धोंडू पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सफौ संजय पाटील करीत आहेत.

No comments