शासकीय 'लाडकी बहिण' योजनेचे अर्ज आता ऑफलाईन भरणार ग्रामपंचायत स्तरावर या योजनेंच्या लाभार्थ्यांचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने जमा करून ते...
शासकीय 'लाडकी बहिण' योजनेचे अर्ज आता ऑफलाईन भरणार
ग्रामपंचायत स्तरावर या योजनेंच्या लाभार्थ्यांचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने जमा करून ते स्वतः ग्रामपंचायत प्रशासनाने भरावेत
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो
संपादक:- हेमकांत गायकवाड
जळगाव : जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी महिलांची दाखल्यांसाठी फरफट होत असुन यंत्रणेवर देखील दाखले देण्यासाठी ताण पडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर या योजनेंच्या लाभार्थ्यांचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने जमा करून ते स्वतः ग्रामपंचायत प्रशासनाने भरावे, महिलांकडून फक्त अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्विकारून ग्रा. पंनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश आज प्रभारी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक राजु लोखंडे यांनी दिले. जिल्हा परिषदेची समन्वय समितीची सभा आज दि.९ रोजी छत्रपती शाहु महाराज सभागृहात पार पडली. या सभेत जि.पचे सर्व विभाग प्रमुख, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैदयकिय अधिकारी, उपविभागीय अभियंता यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जि.प व पंचायत समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. रेशन कार्डवरून लाभार्थी निश्चित करा
जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सेतू कार्यालयांवर तर दाखले काढण्यासाठी तलाठी, तहसील कार्यालयासह शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गर्दी होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी संबधीत गावात उपलब्ध असलेल्या पिवळे व केशरी कार्डधारकांच्या याद्यांवरून महिलांची लाभार्थीचे ऑफलाईन अर्ज स्विकारून ते स्वतः ग्रामपंचायतीतून भरावे तसेच
मनपा व ग्रामपंचायत भरुन घेणार अर्ज
* रेशनकार्डवरुन गावातील लाभार्थी ठरणार
* डीपीडीसी निधीचे नियोजन पाच दिवसात सादर करा
* जि.प समन्वय समितीत आदेश
नगरपालिका क्षेत्र त्या त्या भागातील महिलांचे अर्ज भरतील. यासाठी तात्काळ नियोजन करावे असे आदेश बैठकीत देण्यात आले.
डीपीडीसीचे नियोजन तात्काळ करा
जिल्हा परिषदेला डीपीडीसीकडून नियत्वे प्राप्त झाले आहे. आता आचारसंहिता संपली असल्याने प्रत्येक विभागाने प्राप्त नियत्वेचे नियोजन तात्काळ करावे येत्या पाच दिवसात कामांच्या यादया सादर कराव्यात असे आदेश श्री लोखंडे यांनी दिले. नियोजनाच्या कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी ताकीद त्यांनी दिली. तसेच जलजीवन मिशनच्या कामात येणाऱ्या अडचणी बीडीओ स्तरावर सोडवून कामांना गती दया अशा सुचना ही त्यांनी दिल्या.

No comments