adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

येत्या सोमवारपासून आगारनिहाय 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' आयोजित करण्यात येणार

येत्या सोमवारपासून आगारनिहाय 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' आयोजित करण्यात येणार  प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्र...

येत्या सोमवारपासून आगारनिहाय 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' आयोजित करण्यात येणार 


प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्यासाठी आयोजन 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुंबई 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

प्रवासी व कामगाराच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा करण्यासाठी येत्या सोमवारपासून आगारनिहाय 'प्रवासी राजा दिन' व 'कामगार पालक दिन' आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १५ जुलै रोजी कुर्ला नेहरू नगर आगारातून या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन उपक्रमांतर्गत संबंधित विभागाचे विभाग नियंत्रक वेळापत्रकानुसार एका आगारात जाऊन सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारतील. तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधितांना आदेश देतील. तसेच दुपारच्या सत्रात त्याच आगारात ३ ते ५ या वेळेमध्ये त्या आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकूण घेऊन त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करतील.राज्यभरातील सर्व आगारात दर सोमवारी व शुक्रवारी या दोन्ही उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरूपामध्ये संबंधित आगारात द्याव्या लागणार आहेत.

No comments