adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्यातील एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखे

राज्यातील एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुंबई  (संपाद...

राज्यातील एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- मुंबई 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

 एसटी दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल, असे न्यायालयात कबूल करण्यात आले होते. तरी राज्यातील एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला असून दोन दिवस सुट्टी असल्याने १५ जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होणार आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मे महिन्याच्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी २३०.०६ कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे.

 एसटीला खर्चासाठी कमी पडणारी रक्कम सलग चार वर्षे देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला व त्यानंतर एप्रिल २०२३मध्ये शासननिर्णय जारी करण्यात आला. त्यानुसार खर्चाला कमी पडणारी रक्कम देण्यात आली. त्यानंतर एसटीला देय असलेली २३० कोटी सवलत मूल्य रक्कम वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यातून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्याबाबतचा शासननिर्णय गृह विभागाने जारी केला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

No comments