adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून थकित

  राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून थकित , असल्याने पोलीस पाटलांना मोठ्या आर्थिक अडचणीचा  करावा लागतोय सामाना   न...

 राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून थकित ,असल्याने पोलीस पाटलांना मोठ्या आर्थिक अडचणीचा  करावा लागतोय सामाना  


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वृत्तसंस्था 

(संपादक:- हेमकांत गायकवाड) 

राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेलं असल्याचा धक्कादायक माहिती समोर आलीय . त्यामुळे राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेले पोलीस पाटीलांवर सहा महिन्यांपासून 'बिन पगारी, आपले कर्तव्य बजावण्याची  वेळ आलीय. फेब्रुवारीपासूनचं पोलीस पाटलांचं मानधन थकीत आहे. एप्रिल २०२४ पासून पोलीस पाटलांचं मानधन हे १५ हजार रुपये झाले आहे. आधी हेच मानधन ६५०० रूपये इतके होते. मात्र काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हेच मानधन दुप्पट केले आहे. असे असले तरी राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून थकीत असल्याने पोलीस पाटलांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामाना करावा लागतो आहे.

पाच महिन्यांपासून पोलीस पाटलांचं मानधन थकीत  राज्यातल्या गाव खेड्यात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटील हे एक महत्वाचे पद असून प्राथमिक पातळीवर पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावत असतात. राज्यात सध्या घडीला  एकूण ३७ हजार पोलीस पाटील आहेत. तर दुसरीकडे जवळपास ८ हजार पदं रिक्त असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस पाटलांचे गेल्या पाच महिन्यांचे प्रत्येकी ५८ हजार अडकलेले असल्याने पोलीस पाटील मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकार नेमकं कधी वेतन देणार याची पोलीस पाटलांना प्रतिक्षा लागली आहे. 

No comments