adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव साबा मंडळात शैलेंद्र भंगाळेंची दादागिरी

  जळगाव साबा मंडळात शैलेंद्र भंगाळेंची दादागिरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४५ चे उपविभागीय अधिकारी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग क्र...

 जळगाव साबा मंडळात शैलेंद्र भंगाळेंची दादागिरी

सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४५ चे उपविभागीय अधिकारी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे उपकार्यकारी अभियंता 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  जयराम कोळी 

संपादक:- हेमकांत गायकवाड

चोपडा :- सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४५ चे उपविभागीय अधिकारी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे उपकार्यकारी अभियंता व जळगाव सार्वजनिक बांधकाम मंडळ चे सहाय्यक अधीक्षक अभियंता असे तीन पदे सांभाळणारे शैलेंद्र भंगाळे केवळ नाशिक प्रादेशिक मंडळातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्यात ते एकमेव अधिकारी आहेत कारण महाराष्ट्रात कोणत्याही कायद्याला न जुमानणाऱ्या अधीक्षक अभियंता प्रशांत पितांबर सोनवणे यांचे ते उजवे हात आहेत शैलेंद्र भंगाळे हे तीन ठिकाणी माहिती अधिकारी व एका ठिकाणी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून काम बघतात सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४५ सार्वजनिक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय जळगाव अशा तीन ठिकाणी ते माहिती अधिकारी म्हणून सेवारत आहेत तसेच अधीक्षक अभियंता कार्यालयात ते प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहेत असे चार पदभार सांभाळणारे शैलेंद्र भंगाळे यांनी माहितीच्या अधिकार अधिनियम २००५ हा कायदा धाब्यावर बसवला असून सदर कायद्याचे त्यांना प्राथमिक ज्ञान नाही याची प्रचिती मला अनुभवातून आलेली आहे तीच गत अधीक्षक अभियंता प्रशांत पितांबर सोनवणे यांची आहे कायदेशीर रित्या अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय हे स्वतः अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्त असतात परंतु ती जबाबदारी बेकायदेशीरपणे शैलेंद्र भंगाळे कडे सोपविली आहे व अधीक्षक अभियंता यांना आपल्या कर्तव्याची कुठलीही जाणीव नाही फक्त हिटलर प्रमाणे जळगाव सार्वजनिक बांधकाम मंडळ अंतर्गत ते आपली हुकूमशाही पद्धतीने हुकूमत गाजवतात त्यांच्या हुकूमतीला छेद देण्याचे सामर्थ्य जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही आमदार खासदार किंवा पालकमंत्र्यासहित अन्य दोन मंत्र्यांमध्ये नाही हे देखील कटू सत्य आहे ते बेकायदेशीरपणे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम जळगाव या पदावर विराजमान आहेत व त्याच धर्तीवर शैलेंद्र भंगाळे सारखे अन्य अधिकारी कारभार चालवितात उदाहरणार्थ अमळनेर येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता एम एस राजपूत यांनी तर आपल्या सेवेमध्ये कहर केला होता त्याच वाटचालीवर सध्याचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील यांची वाटचाल सुरू आहे जळगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे एस आर राऊत जळगाव बांधकाम बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी गिरीश सूर्यवंशी मुक्ताईनगर येथील रस्त्यांच्या अनियमित येथे बाबत तक्रारीने बदली झालेले इमरान बुरान शेख व गणेश पाटील यांनी एकनाथराव खडसे च्या नाकावर टिच्चून आपली बदली रद्द केली सावदा व रावेर या दोघेही उपविभागांमध्ये एकामध्ये नियमित सेवा तर दुसऱ्या उपविभागाच्या पदभार असा कारभार आयबी शेख यांनी चालविला जिल्ह्यात सर्वात भ्रष्ट अधिकारी म्हणून ओळख असलेले व पीपी सोनवणे चे खंदे समर्थक असलेले गणेश पाटील यांना शासनाच्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कार लाभला चोपडा येथे आठ वर्ष मुक्काम ठोकून पुन्हा २०१६ पासून ते आतापर्यंत शाखा अभियंता व पदोन्नतीने उपविभागीय अधिकारी म्हणून पुन्हा आठ वर्ष म्हणजेच २०१६ पासून ते आतापर्यंत यावल येथे तळ ठोकून बसलेले जे एस तडवी यांना देखील शासनाच्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कार लाभला विशेष म्हणजे यावल तालुक्यातील बोगस कामांची फार मोठी शृंखला असताना देखील केवळ पीपी सोनवणे यांचे हस्तक असल्यामुळे त्यांना हा बहुमान मिळालेला आहे तसेच यावल येथील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन केतन अशोक मोरे यांची बदली मे २०२३ मध्ये चोपडा येथे झाली असली तरी त्यांनी देखील यावल येथेच आपला तंबू ठोकून बसलेले आहेत पारोळ्यात वीस वर्षापासून तळ ठोकून बसलेले अहिरराव सारखे असंख्य अधिकाऱ्यांची फौज अधीक्षक अभियंता पीपी सोनवणे यांनी आपल्या दिमतीला ठेवलेली आहे दप्तर दिरंगाई कायदा व बदल्यांचे विनिमयन २००५ हा कायदा पूर्ण धाब्यावर बसवल्या गेला असून वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी यांच्या बदल्या मुख्य अभियंता प्रशांत औटी यांच्या आदेशानुसार होत असल्या तरी त्या केवळ कागदावरच असून प्रशांत ओटी ला शह देत प्रशांत सोनवणे जैसे थे ठेवतात बेकायदेशीरपणे तीन तीन ठिकाणी माहिती अधिकारी व एका ठिकाणी अपिलीय अधिकारी म्हणून तसेच तिघही मोक्याच्या ठिकाणी पदभार सांभाळणारे शैलेंद्र भंगाळे यांना देखील अधीक्षक अभियंता प्रशांत पितांबर सोनवणे यांच्याकडून लवकरच त्यांचे पारितोषिक त्यांच्या पदोन्नतीने देण्यात येईल व ते लवकरच कार्यकारी अभियंता होतील असे चित्र आजमितीस दिसून येते.

पत्रकार जयराम कोळी ९९६०१२४९०४

 

No comments