"एक पेड माँ के नाम" व " अमृतवृक्ष आपल्या दारी" या योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन नेशन महाराष्ट्र न्यू...
"एक पेड माँ के नाम" व "अमृतवृक्ष आपल्या दारी"या योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
आज रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी परीक्षेत्र चोपडा कडील ग्रामपंचायत निमगव्हाण येथील जय श्री धुनिवाले दादाजी यांचे समाधी मंदिर परिसरात ग्रामपंचायत क्षेत्रात घनश्याम अग्रवाल मित्रमंडळाच्या सौजन्याने व मा. श्री. संजय पाटील विभागीय वन अधिकारी सामाजिक वनिकरण जळगाव यांच्या संकल्पनेतुन वनमहोत्सव "एक पेड माँ के नाम" व "अमृतवृक्ष आपल्या दारी"या योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वृक्षारोपण प्रसंगी मा मंत्री श्री. अनिल पाटील, आमदार श्री. सोनवणे आणि मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद,यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमास मा. प्रांत साहेब श्री महादेव खेडकर, तहसीलदार श्री. बाळासाहेब थोरात, BDO श्री. रमेश वाघ, वनक्षेत्रपाल श्री. योगेश सातपुते, श्री. विनोद पाटील,वनपाल श्री. तुषार देवरे, वनपाल श्री. भामरे, वनमजूर श्री. अंकुश धुपे उपस्थित होते.







No comments