adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न शिक्षण सप्ताहात विविध उपक्रम साजरा

  लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न शिक्षण सप्ताहात विविध उपक्रम साजरा नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- जळगाव जिल्हा प्रतिन...

 लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न शिक्षण सप्ताहात विविध उपक्रम साजरा


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

अमळनेर: येथील लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताहाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. हा सप्ताह २२ जुलै ते २८ जुलै दरम्यान घेण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात अनेक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विज्ञान दिवस, वाचन दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, इको क्लब फाॅर मिशन लाईफ उपक्रम, गीत गायन, पेंटींग, विविध खेळ, वेशभूषा अशा विविध उपक्रमांचा समावेश केला गेला. शिक्षण सप्ताहामुळे विद्यार्थी, शिक्षक, यांच्यामध्ये सहकार्य वाढीस लागणार आहे.


या सप्ताहातील कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, मनिषा खांजोडकर, सायली देशपांडे, मधुकर सोनार, आशा सोनवणे, रेखा कांबळे, मृदूला झारे, माधुरी सोनार, संदीप महाजन यांनी केले. तसेच संपूर्ण सप्ताहाचे तांत्रिक सहाय्य तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले यांनी केले. साप्ताहिक उपक्रम यशस्वीतेसाठी  सर्वांना विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

No comments