विविध कलागुणांना वाव देणारा शिक्षण सप्ताह जिल्हा परिषद खेडी भोकरी शाळेत साजरा नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संपादक :- हेमकांत ग...
विविध कलागुणांना वाव देणारा शिक्षण सप्ताह जिल्हा परिषद खेडी भोकरी शाळेत साजरा
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी भोकरी येथे दिनांक 22 जुलै ते 28 जुलै अखेर शिक्षण सप्ताहाच्या आयोजन करण्यात आले यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन अध्यापन साहित्याचे वाचन लेखन केले, तर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस अंतर्गत गणित पेटी भाषा पेटी लेखन पूर्वतयारी व गणन पूर्वतयारी करून घेणे ,भौमितिक आकृत्या काढणे यांच्या सराव करण्यात आला तर ,क्रीडा दिवस अंतर्गत लिंबू चमचा व इतर पारंपारिक खेळाचे आयोजन करण्यात आले .
झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देण्यात आल्या शेवटी शाळेत माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील वासुदेव पाटील यांच्याकडून स्नेह भोजनात वरण-भात शिरा परसबागेतील वांग्याची भाजी मिरच्यांची भाजी हा मेनू देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी रूही रवींद्र पाटील, प्राची लक्ष्मण धनगर ,मानसी राहुल सैंदाणे, देवयानी सोपान सोनवणे, सृष्टी महेंद्र पाटील कुणाल भगवान पाटील ,कुणाल वाघ तर दिव्यांग विद्यार्थी ऋषिकेश वाघ व ज्ञानदीप महाले यांनी सांस्कृतिक कार्यक्रममात उत्तम सादरीकरण केले .
मातीकाम या उपक्रमांतर्गत राजवीर अमोल कोळी ,धनुष करमचंद पाटील ,समर्थ विठ्ठल कोळी यांनी उत्कृष्ट कलागुण सादर केले .तर क्रीडा स्पर्धेत अश्विन मुलसिंग बारेला ,प्रणव प्रवीण पाटील ,मोहित सुनील पाटील, पुष्पराज संदीप पाटील यांनी चांगली कामगिरी केली. शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी म.गट शिक्षणाधिकारी अविनाश पाटील व केंद्रप्रमुख ताईसो वैशाली पाटील व परीक्षीत चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमात मुख्याध्यापक भास्कर पाटील यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश शिरसाठ ,रोहिदास कोळी, विक्रम बोरसे यांनी अथक परिश्रम घेतले
No comments