घरातील कांदा कापण्याचा चाकु हातात घेवुन अंगावर धावुन येवुन फिर्यादीच्या डाव्या डोळ्या खाली चाकुने मारहाण करुन दुखापत नेशन महाराष्ट्र न...
घरातील कांदा कापण्याचा चाकु हातात घेवुन अंगावर धावुन येवुन फिर्यादीच्या डाव्या डोळ्या खाली चाकुने मारहाण करुन दुखापत
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
दिनांक ०७.०७.२०२४ रोजी दुपारी ०३.०० वा.च्या सुमारास चोपडा शहरातील मोठा देव्हारा येथिल रहिवासी लताबाई कृष्णा गिरी वय ५८ रा. मोठादेव्हारा चोपडा यांचे राहते घरी १) सोनाली सागर बुवा रा. मोठादेव्हारा चोपडा २) मनोज रावन पुरी रा.अदिवासी भवन जवळ बंगला न.३१ दादर नगर हवेली सेलवास जि.दादर नगर हवेली यांनी दिनांक ०७.०७.२०२४ रोजी दुपारी ०३.०० वा.च्या सुमारास आरोपी ०२) याने फिर्यादी व त्याचा मुलगा म्हणजेच आरोपीताचा जावाई यांना खालिल कारणावरुन शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली व आरोपी क्र.०१ व साक्षीदार तिचे पती सागर कृष्णा बुवा हा तिला समजावीत होता मी तुला नवीन मोबाईल व पैसे देणार नाही सध्या माझ्या कडे पैसे व मोबाईल नाही यावरुन त्यांच्यात शाब्दीक वाद सुरु असतांना फिर्यादी ही आरोपीला समजवण्यास गेली असता तिचे वाईट वाटल्यावरुन तिने घरातील कांदा कापण्याचा चाकु हातात घेवुन फिर्यादीच्या अंगावर धावुन येवुन फिर्यादीच्या डाव्या डोळ्या खाली चाकुने मारहाण करुन दुखापत करुन साक्षीदार यास म्हणाली की तुम्ही जर तुमच्या आई वडीलांना घराच्या बाहेर काढले नाही तर मी फक्त डोळ्या खाली चाकु मारलेला आहे तुम्ही ड्युटीवर गेल्यावर मी त्यांचा पोटावर मारेल अशी धमकी दिली तरी संबंधित तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमलदार पोना/ धर्मेंद्र ठाकुर चोपडा शहर पो.स्टे चोपडा शहर पो.स्टे.CCTNS. (भाग-५) नंबर २९७/२०२४ भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२),१३१,३५२, ३५१(२).३ (५) प्रमाणे. गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि/ मधुकर साळवे चोपडा शहर पो स्टे.यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ संदीप छगन भोई नेम चोपडा शहर पोस्टे हे करीत आहेत

No comments