माचले ता . चोपडा येथील युवकाचा मोटार अपघातात मृत्यू कुलदीप अशोक पगारे याचा मोटार अपघातात मृत्यू नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संप...
माचले ता . चोपडा येथील युवकाचा मोटार अपघातात मृत्यू
कुलदीप अशोक पगारे याचा मोटार अपघातात मृत्यू
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
माचले ता . चोपडा येथील रहिवासी कुलदीप अशोक पगारे वय.२१ रा.यास दि. दि.०७/०७/२०२४ रोजी २०.०० वा.चे पुर्वी वेळ नक्की नाही मोटार अपघात झाल्याने त्यास उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल करण्यात आले होते तरी CMO डॉ. सपना पाटील उपजिल्हा रुग्णालय चोपडा यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला फोनद्वारे कळविले की, यातील मयत नामे कुलदीप अशोक पगारे वय.२१ रा. माचला ता. चोपडा जि. जळगांव यास मोटार अपघातात मार लागल्याने त्यास उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासून पाहता मयत घोषीत केले आहे. अंमलदार - पोहेकाँ/ हेमंत मोहन कोळी चोपडा शहर पो.स्टे.यांनी अ.मृ रजि. नं. 49/2024 बि.एन.एस.एस. 194 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोनि/मधुकर धोंडिबा साळवे चोपडा शहर पोस्टे यांचे मार्गदर्शनाखाली RPSO पोहेकॉ/ महेंद्र साळुंखे हे अधिक तपास करीत आहेत

No comments