बहुजन समाजाला न्याय, शिक्षण,, नोकरी,रोजगार,स्वास्थ मूलभूत घटकांची पूर्तता करू नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- जळगाव (संपादक :- हेमकां...
बहुजन समाजाला न्याय, शिक्षण,, नोकरी,रोजगार,स्वास्थ मूलभूत घटकांची पूर्तता करू
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- जळगाव
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
दि.११.ऑगस्ट २४ रविवार रोजी दुपारी १२ वाजलेला पद्मालय शासकीय विश्राम गृह,जळगाव येथे बहुजन समाज पार्टी जिल्हा जळगावची मिटिंग जिल्हा उपाध्यक्ष मा. नारायणजी अडकमोल साहेब यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
या मिटिंग मध्ये मा. अडकमोल साहेबांनी अध्यक्षीय भाषणात कार्यकर्ते व पद अधिकाऱ्यांना संबोधित करतानां सांगितले की बीजेपीच मनुवादी, गोडसेवादी सरकार हे SC, ST जनतेचंचा वर्गीकरणाचा जहरी,कुटील डाव रचून आरक्षण संपववत आहे व त्याला छुपा पाठिंबा मनुवादी गांधीवादी काँग्रेस व त्याची इतर मनुवादी पिलावळ मित्र पक्ष करीत आहे.
I.N.D.I.A गटबंधनने खूप मोठी धोकेबाजी संपूर्ण भारत,बहुसंख्य बहुजन गोर गरीब sc, st समाजासोबत गद्दारी करीत आहे, बीजेपी व काँग्रेस मिळून देशा सोबत गद्दारी करीत आहेत.असं मा.अडकमोल साहेबांनी या विषयी नमूद केले. त्या नंतर निष्ठावान व कर्तव्यदक्ष कार्यकर्ते मा. सुशीलजी केदारे साहेबांनी कार्यकर्त्याना सखोल असं,अनेक पैलुंवर, विविध मुद्यांवर छान पैकी सुरेख मार्गदर्शन केले.
मिटिंग मध्ये मा. जिल्हा प्रभारी सतीश बिऱ्हाडे, जिल्हा महासचिव मा. राजाराम मोरे, जिल्हा B.V.F. संयोजक मा. लुले साहेब, जिल्हा सचिव संदीप मगरे, रावेर विधानसभा अध्यक्ष मा.ईश्वर जाधव, चोपडा विधानसभा अध्यक्ष मा. सचिन बाविस्कर, मुक्ताईनगर विधानसभा अध्यक्ष मा. आवेश खाटीक,जळगावचे माजी विधानसभा अध्यक्ष मा. हेमंत बिऱ्हाडे व असंख्य कार्यकर्ते व पदअधिकारी उपस्थिती होते.
या मिटिंग मध्ये सामाजिक कार्यकर्ते व जळगाव रिक्षा युनियन चे अध्यक्ष मा. शांतारामजी अहिरे यांनीं बहुजन समाज पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला व त्यांना असंख्य कार्यकर्त्याच्यां उपस्थितीत सर्वानुमते बहुजन समाज पार्टी जळगाव शहर महानगर अध्यक्ष पद बहाल कारण्यात आले.
येणाऱ्या काळात बहुजन समाज पार्टी ला मजबूत करून मान्यवर कांशीरामजी व बेहन कु. मायावतीजीचें ध्येय व अजेंडा नुसार राजकीय सत्ता काबीज करू व बहुजन समाजाला न्याय, शिक्षण,, नोकरी,रोजगार,स्वास्थ मूलभूत घटकांची पूर्तता करू
No comments