adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीशिवाय पर्याय नाही...जगदीश सु.ल .मानवतकर सर ..

  मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीशिवाय पर्याय नाही... जगदीश सु.ल .मानवतकर सर .       नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- हिंगोली  (संपादक  :- हेमका...

 मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीशिवाय पर्याय नाही...जगदीश सु.ल .मानवतकर सर .


 

    नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- हिंगोली 

(संपादक  :- हेमकांत गायकवाड)

 ११ ऑगस्ट २०२४  स्थानिक देवठाणा तालुका जिल्हा हिंगोली येथे ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जगदीश सु.ल.मानवतकर सर यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीच्या  व्याख्यानानिमित्त अस विचार मांडले की , '' साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समजून घ्यायचे असतील तर अगोदर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घ्यायला  हवे .


कारण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या शोक सभेमध्ये ''   जग बदल  घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव ,  गुलामगिरीच्या या चिखलात रूतुन बसला का एरांवत , निघ बाहेरी घे बनी वरती धाव , सांगून गेले मला भीमराव '' .  साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या या काव्या द्वारे डॉ.बाबासाहेबांना मानवंदना दिली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपली सर्वात आवडती आणि  जिवापाड असणारी फकीरा कादंबरी ही डॉ .बाबासाहेब आंबेडकर  यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली .

साहित्यरत्न डॉ . अण्णाभाऊ साठे यांची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १९४२ मध्ये नागपूर येथे शेड्युल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनात भेट झाली होती.  असे ऐतिहासिक पुरावे आपल्या जवळ आहेत . म्हणून समस्त मातंग समाजाने आंबेडकरी चळवळीमध्ये येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,   डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्वप्न साकार करायला पाहिजे . साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा समाज आपल्याला घडवायचा आहे . यासाठी आपल्याला उच्चशिक्षित होऊन आणि संघटित होऊन  मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी व्हावे लागेल.

कारण कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा मातंग समाजावर प्रेम होते . डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,  की मला जर मुलगी झाली असती  तर ती मी मातंग समाजाच्या घरी दिली असती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मातंग समाजाच्या अनेक सभा घेतलेल्या आहेत . त्याची ऐतिहासिक पुरावे आपल्याजवळ आहेत.  मातंग समाज हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी कालही प्रामाणिक होता , आजही आहे आणि उद्याही राहणार. तरी सर्व मातंग समाजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर , डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालून  आपले जीवन सफल करायाला हवे. साहित्यरत्न  डॉ. अण्णाभाऊ भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जयंतीच्या अनुषंगाने द्यावा , साहित्य अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक वाशिम मध्ये व्हावे , साहित्यरत्न भाऊ साठे यांच्या नावाने स्कॉलरशिप व्हाव्यात,  अण्णाभाऊ साठे यांच्यावर साहित्यावर संशोधन व्हावे, मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार दूर व्हावेत , ज्याप्रमाणे केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने भारत क्रिकेट टीमला भरपूर आर्थिक मदत केली तशीच आर्थिक मदत मातंग समाजाच्या धावपटू अविनाश साबळे याला करावी ,  भारत सरकारने १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी . अशा बऱ्याच मागण्या यावेळी जगदीश मानवतकर सर यांनी बोलून दाखवले . भारताच्या पंतप्रधान यांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भारत क्रिकेट टीमचे कामगिरी दिसते  परंतु मातंग समाजाच्या आर्मी मध्ये काम करणाऱ्या अविनाश साबळे या बीड मधील युवकाने धावण्याच्या खेळात केलेला  विश्वविक्रम हा दिसत नाही . ही शोकांतिका आहे. तरी अविनाश साबळे मातंग समाजाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू याला  १ कोटीची  आर्थिक मदत द्यावी .अशी मागणी सुद्धा जगदीश मानवतकर सर  यांनी यावेळी  केली . तसेच जगदीश मानवतकर सर यांनी मातंग समाजाने आपल्याला मांग म्हणून  घेऊ नये . कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सन्मानाने जगण्याचे अधिकार मिळवून दिलेले आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी आपल्याला मांगाचा मातंग केलेला आहे.  म्हणून आपण स्वतःला मांग म्हणून समजून घेऊ नये असे आव्हान सुद्धा जगदीश मानवतकर सर यांनी उपस्थित बंधू आणि भगिनींना . साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर विचारमंथन होऊन साहित्याचे वाचन झाले पाहिजे , दर १ ऑगस्ट २०२४ रोजी  जयंतीच्या अनुषंगाने ८  तास त्यांचे साहित्याचे वाचन झाले पाहिजे , त्यासाठी उपक्रम करायला हवे , साहित्य संमेलन भरवायला हवे हीच खरी त्यांना जयंतीच्या अनुषंगाने मानवंदना ठरेल . असे विचार प्रा.जगदीश मानवतकर सर यांनी यावेळी मांडले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवतरावजी डोंगरे , कार्यक्रमाचे उद्घाटक आत्माराम  गायकवाड सर , प्रमुख वक्ते जगदिश सु. ल.मानवतकर सर , मधुकर सुतार नामदेव , प्रमोद वैरागड , संदेश शिखरे सह सर्व मातंग समाजातील सन्माननीय मंडळी उपस्थित होते .              हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून एकनाथ कर्डिले , महादेव साबळे संदीप खंदारे , बबन साबळे, रवी कर्डिले, दत्तराव खंदारे , विजय कर्डिले , आकाश कर्डिले ,  विठ्ठल कर्डिले , ज्ञानेश्वर कर्डिले सह सर्व लहुजी शक्ती सेना मित्र मंडळ सह  सर्व मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाची आयोजन लहुजी शक्ती सेना मित्र मंडळ देवठाणा यांच्यातर्फे करण्यात आले होते.

No comments