आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन तालुका उपनिरीक्षक पोलीस अधिकारी व तहसीलदार साहेब यांच्या विनंती वरून हे ज...
आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन
तालुका उपनिरीक्षक पोलीस अधिकारी व तहसीलदार साहेब यांच्या विनंती वरून हे जन आक्रोश आंदोलना तात्पुरती स्थगिती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आज दि.26/8/2024 चोपडा येथे आमच्या आदिवासी बांधवांच्या 13 जिल्ह्यातील 17 संवर्ग आदिवासी पेसा पदभरतीतील सुप्रीम कोर्टाचा कुठलीही स्थगिती नसतांनाही भरती प्रक्रिया का थांबवण्यात आलेली आहे आदिवासी समाजाची कुठेतरी फसवणूक होत आहे प्रशासनाने आमची पेसाभरती जाणून बुजून स्थगिती दिलेली आहे
दोन-चार दिवसात 17 संवर्गाच्या कायमस्वरूपी आणि तात्काल नियुक्ती देण्यात यावी यासाठी आमचे आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन भर पावसात सुरू होता त्या ठिकाणी तालुका उपनिरीक्षक पोलीस अधिकारी व तहसीलदार साहेब यांच्या विनंती वरून हे जन आक्रोश आंदोलन तात्पुरता स्थगिती घेण्यात आलेली आहे जर आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे
1)ज्योतीताई पावरा माजी जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष 2)रामचंद भादले माजी सभापती 3) डॉक्टर चंद्रकांत बारेला 4) ज्ञानेश्वर भाऊ एकलव्य संघटनेचे अध्यक्ष5) नामा पावरा जळगाव ग्रामीण अध्यक्ष6) सुनील भिल 7)सोमनाथ भिल 8)अनिल पावरा9) सागर सांगोरे 10) नयब तडवी11) करण बारेला12) प्रमोद पावरा आंदोलनाच्या ठिकाणी हे पदाधिकारी उपस्थिती होते
No comments