28 सप्टेंबर 2024 रोजी माहिती अधिकार दिनी माहितीचा अधिकार जनजागृती अभियान संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडे ईमेल व्...
28 सप्टेंबर 2024 रोजी माहिती अधिकार दिनी माहितीचा अधिकार जनजागृती अभियान संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडे ईमेल व्दारे मागणी ----माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
माहितीचा अधिकार अधिनियम-2005 कायद्यास 28 सप्टेंबर 2024 रोजी 19 वर्षे होत आहेत. सदरील अधिनियमाची सामान्य जनमाणसात जनजागृती होणेसाठी सर्व शासकीय कार्यालयात साजरा करणेसाठी निर्देशित करण्यात आले आहे. परंतु वस्तुनिष्ठ माहिती अन्वये असे निदर्शनास आले आहे कि, संबंधीत दिवशी कार्यालयास शासकीय सुट्टी असल्यास अथवा काही कार्यालयात जाणिवपूर्वक माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात येत नाही त्याआधारावर माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. भगवान चौधरी यांनी मुख्यमंत्री कार्यालयास ई-मेल च्या माध्यमातून पत्राद्वारे मागणी केली होती की, 28 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात माहिती अधिकार दिन सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्यात यावा त्याचप्रमाणे 28 सप्टेंबर या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती होणेसाठी 27 सप्टेंबर अथवा 29 सप्टेंबर यादिवशी माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची अमलबजावणी करण्यात येईल असे अश्वाशीत करण्यात आले. माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. भगवान चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नक्कीच माहितीचा अधिकार अधिनियम-2005 या कायद्या विषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊन शासकीय कामात येणारे अडथळे कमी होतील याबाबत सामान्य नागरिक आशावादी आहेत.
No comments