_हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत माजी सैनिक सत्कार समारंभ आयोजन_ नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ शिरपूर येथे हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत...
_हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत माजी सैनिक सत्कार समारंभ आयोजन_
नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ शिरपूर येथे हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत माजी सैनिक सत्कार समारंभाचे आयोजन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- शिरपूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
आज दिनांक १३/८/२०२४ मंगळवार रोजी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ शिरपूर येथे हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत माजी सैनिक सत्कार समारंभाचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले. सत्कारमूर्ती आदरणीय माजी सैनिक सी.आर.पी.एफ. जवान श्री किरण अर्जुन मंगळे यांना शाळेमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री राजेसिंग पावरा सर यांनी सत्कारमूर्ती आदरणीय माजी सैनिक श्री किरण मंगळे सर यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर शिक्षक पालक संघाचे सदस्य श्री गणेश भाऊ बाशिंगे यांचा सत्कार इंगोले सर यांनी गुलाब पुष्प देऊन केला. त्यानंतर सत्कारमूर्ती माजी सैनिक श्री किरण मंगळे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील काही प्रसंग तसेच जीवनातील ध्येय कसे असावे याविषयी अमूल्य मार्गदर्शन अनुभव कथनातून केले. त्यानंतर सत्कारमूर्ती श्री किरण भाऊ मंगळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. त्यानंतर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री पावरा सर यांनी आभार प्रदर्शन केले तर सूत्रसंचालन इंगोले सर यांनी केले. प्रभारी मुख्याध्यापक श्री पावरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. सूर्यवंशी मॅडम व खरे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम केले.
No comments