वाशिम येथे दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत कॅण्डल मार्च रॅलीचे आयोजन नेशन ...
वाशिम येथे दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत कॅण्डल मार्च रॅलीचे आयोजन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- वाशिम
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
कॅन्डल मार्च ! कोलकाता येथील आरजी.कर हॉस्पिटल मधील ट्रेनी महिला डॉक्टर यांच्यावर दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या निघृण हत्या आणि बलात्कार घटनेतील मुख्य आरोपी संजय रॉय आणि त्याचे इतर साथीदार यांना तात्काळ फासावर लटकविण्यात यावं, त्याचप्रमाणे संबंधित हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी , आर .जी. कर हॉस्पिटलची मान्यता रद्द करून दोषी डॉक्टर, नर्स आणि हॉस्पिटल मधील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना कायदेशीर कडक शिक्षा व्हावी , तसेच पीडिताच्या कुटुंबाला न्याय मिळावा , या घटनेचा जाहीर निषेध करण्याकरता दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत कॅण्डल मार्च रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी ठीक सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे जिल्हाधिकारी साहेब यांच्या द्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान यांना या घटनेतील मुख्य आरोपी संजय रॉय सह संबंधित दोषी डॉक्टर , नर्स तरीही अधिकारी साथीदार यांना तात्काळ फाशी देण्यात यावी, पिडीताच्या आई-वडिलांना न्याय मिळावा या व इतरही मागण्या करण्याकरिता निवेदन देणार येणार आहे .तरी वाशिम मधील सर्व बंधू भगिनी आणि वाशिम करांनी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे ठीक सकाळी ११ वाजता व या कॅण्डल मार्च रॅलीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम येथे ठीक सायंकाळी 6 वाजता बहुसंख्येने जमावे असे आव्हान जगदीश मानवतकर सर यांनी केले. हे कॅण्डल मार्च रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत राहणार आहे . वाशिम मध्ये सर्व युवकांनी युतीने हातामध्ये तिरंगी झेंडा घेऊन आणि कॅण्डल घेऊन उपस्थित रहावे असे आव्हान जगदीश मानवतकर सर ऑल इंडिया ब्लू टायगर सेना प्रमुख यांनी केले आहे. ही कॅन्डल मार्च रॅली ऑल इंडिया ब्लू टायगर सेना , जगदीश मानवतकर सर समर्थक ग्रुप जगदीश मानवतकर सर युवा मंच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवती व वाशिम करांच्या वतीने करण्यात आली आहे. तरी ज्या युवकृतींना रॅलीमध्ये तिरंगी झेंडा व कॅण्डल घेऊन यायचे असेल त्यांनी 9307391785 या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान जगदीश मानवतकर , राजकुमार पडघान , माधव डोंगरदिवे सर , संविधान ढोले , विशाल मुंडे ,अक्षय इंगोले , आशिष कोकरे , सचिन राऊत, गौतम कंकाळ , बादल वानखडे, मुकेश ताजने ,मयुरेश मानधने ,नितीन बांगर ,रामदास कालापाड, शेळके पाटील, बाळू कदम , रविभाऊ ठोके , सुभाष वाठोरे , सुखदेव वानखडे , गजेंद्र राऊत , बबनराव वाळके , रमेश गायकवाड यांनी केले आहे.

No comments