आदिवासींचा विकास हिच माझी खरी सेवा - पीओ अरण पवार. उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानित नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- यावल रावेर मो...
आदिवासींचा विकास हिच माझी खरी सेवा - पीओ अरण पवार. उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानित
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- यावल रावेर मोहसीन तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आदिवासी विभागांतर्गत आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विभागांत प्रकल्प कार्यालये आहेत... शासन स्तरावरील विविध योजना आदिवासी बांधवान पर्यंत पोहचवणे व आदिवासी बांधवांना प्रगतीपथावर आणणे.. अशा एक ना अनेक उद्देशांतून आदिवासी प्रकल्प कार्यालये यांची निर्मिती केलेली आहे
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विविध योजना मिळवून देण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे आहे... या कार्यालय मार्फत जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विविध योजना राबवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात.. यात पकल्प अधिकारी म्हणून मा. श्री अरुण पवार साहेब हे सध्या यावल येथे कार्यरत आहेत...त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आदिवासी बांधवान साठी विविध योजना आणि विकास कामे राबवून आदिवसी बांधवान मध्ये मिळून मिसळून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते..
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनआज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री गुलाबराव पाटील व मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून २०२३-२४ या मागील वर्षात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा. अरुण पवार प्रकल्प अधिकारी यावल व श्री.. करवंदे सर यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले... हा फक्त त्यांचा सन्मान नसून जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी समाजाचा सन्मान आहे... असे प्रकल्प अधिकारी यावल विभागाला मिळाल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे... मा. प्रकल्प अधिकारी यांचे कार्य असेच आदिवासी बांधवांसाठी अविरत चालू राहावे हीच अपेक्षा आदिवासी कडून करण्यात आली तसेच विविध स्तरावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

No comments