तलाठी भुषण पाटिल यांची बदली रद्द साठी तहसिलदारांना निवेदन तलाठी भुषण पाटील यांची बदली रद्द करावी अशी सर्वच स्तरावरून जोरदार मागणी नेशन म...
तलाठी भुषण पाटिल यांची बदली रद्द साठी तहसिलदारांना निवेदन
तलाठी भुषण पाटील यांची बदली रद्द करावी अशी सर्वच स्तरावरून जोरदार मागणी
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :-विश्राम तेले चौगाव
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
चौगाव -चुंचाळेे येथे कार्यरत असलेले तलाठी भुषण शांताराम पाटिल हे गेल्या तीन वर्षापासून चौगाव चुंचाळे सजेच्या ठिकाणी उत्क्रुष्ठ सेवा देत असतांनाच नुकतीच त्यांची बदली चोपडा तालुक्यातच धुपे या ठिकाणी करण्यात आली.
तलाठी भूषण पाटिल यांचे कार्य हे अतिशय चांगले असल्यामुळे त्यांची बदली रद्द करून त्यांना पुर्ववत चौगाव चुंचाळे येथील सजेचा कार्यभार सोपवावा अशी मागणी या निवेदनातून चौगाव,चुंचाळे व लासुर येथील शेकडो शेतकर्यांनी चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.तलाठी भुषण पाटील हे फक्त तलाठी नसून शेतकरी,जेष्ठ नागरीक यांचे सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक असल्याची भावना चौगाव येथील शेतकर्यांनी बोलून दाखवली.
निसर्ग व पर्यावरणाबाबत गेल्या तीन वर्षात त्यांचे चौगाव चुंचाळे परीसरात फार मोठे योगदान राहीले आहे. शासनाने शेतकर्यांच्या भावनेचा विचार करून तलाठी भुषण पाटील यांची बदली रद्द करावी अशी मागणी सर्वच स्तावरून जोर धरत आहे

No comments