adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किनगाव बु, ता. यावल, येथिल युवकाने केली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पत्राद्वारे केली अनोखी मागणी

  किनगाव बु, ता. यावल, येथिल युवकाने केली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पत्राद्वारे केली अनोखी मागणी  श्री.मोहन रमेश पाटील, रा. किनगाव...

 किनगाव बु, ता. यावल, येथिल युवकाने केली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पत्राद्वारे केली अनोखी मागणी 


श्री.मोहन रमेश पाटील, रा. किनगाव बु, ता. यावल, जि.जळगांव (महाराष्ट्र ) यांनी रविवारच्या सुटी ऐवजी सोमवारी सुटी देण्याची केली मागणी 

सदरील पत्र हे मोहन पाटील रा.किनगाव यांनी देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना लिहिले असून मोहन पाटील यांचेच शब्दातील पत्र खालील प्रमाणे 

महोदय,

मा. श्री.नरेंद्र मोदी  सो.

पंतप्रधान, नवी दिल्ली, भारत 

मी श्री.मोहन रमेश पाटील, रा. किनगाव बु, ता. यावल, जि.जळगांव (महाराष्ट्र )

हिंदवी स्वराज्य सेना, जळगांव जिल्हा अध्यक्ष 

विषय -भारत हे खऱ्या अर्थाने राम राज्य होणे साठी...

मी आपणास या पत्रद्वारे कळवू इच्छितो कि,भारत हे एक हिंदू राष्ट्र होते व ते आहेच.

परंतु भारताच्या लोकांच्या मनातून आपल्या हिंदू सनातन धर्मा विषयी असणारी आस्था हि कमी झालेली आहे., त्याचे कारण 

भारतावर आजवर कितीतरी परकिय लोकांनी राज्य केलं व त्यांच्या संस्कृती च्या माध्यमातून आपल्या देशात गुलामी च्या खुणा सोडून गेलेत.त्याचच उदाहरण म्हणजे आपल्या भारतात रविवार ची सुटी आहे.

इंग्रजानी रविवार ची सुटी आपल्यावर लादली! रविवार हा त्यांचा पवित्र दिवस असून त्या दिवशी ते त्यांच्या प्रार्थना स्थळ (चर्च )येथे सह परिवार जाऊन प्रार्थना करतात.व त्यांच्या संस्कृतीच पालन करतात.

मुस्लिम राष्ट्रांमध्ये त्यांचा शुक्रवार हा धार्मिक कार्या साठी पवित्र असल्याने तिथे शुक्रवारी सुटी असतें. व ते त्यांच्या धर्मासाठी एक दिवस देतात.परंतु आपल्या देशात सुटी हि जशी काही दारू पिण्यासाठी, मांसाहार करण्यासाठी, गुन्हेगारी वाढवण्यासाठी आहे कि काय असं वाटतं.आपल्या देशातील बहुतेक व्यक्ती हा त्याच्या कामात इतका व्यस्त असतो कि तो आपले देव, धर्म, संस्कृती या सर्वांसाठी त्याला वेळ नसतोच, आणि एक रविवार जो मिळतो, तर तो त्या रविवारी मांसाहार जेवण, दारू च्या आहारी जास्त जातो.व देशात गुन्हेगारी, दुराचारी वाढवतो.

माझी एक मागणी आहे, कि आपण आपल्या देशाची सुटी रविवार ऐवजी सोमवार करावी. जेणेकरून आज च्या तरुण पिढीला आपल्या धर्माबाद्दल काहीतरी करण्यासाठी, धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी, आपल्या धर्माबद्दल आस्था वाढवण्यासाठी आठवड्यातून त्यांना एक दिवस तरी मिळेल, व हिंदू सनातन धर्म अजून खुप खुप मोठ्या प्रमाणात जागृत होईल.ते दारूच्या, मान्स च्या दुकानात न जाता आपल्या परिवारा सोबत मंदिरात जातील व आपल्या धर्मावरती त्यांना विचार करायला काही वेळ मिळेल.व खऱ्या अर्थाने भारत एक हिंदू राष्ट्र म्हणजेच राम राज्य तयार होईल.

टीप -खालील pdf मध्ये निवेदन दिलेले आहे.

No comments