Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोलकत्ता व बदलापूर येथे झालेल्या अमानुष कृत्या बद्दल चोपडा तालुक्यात मुकमोर्चा काढून याबाबत लवकरात लवकर निकाल लावण्याकरिता मा. तहसीलदार यांना दिले निवेदन

  कोलकत्ता व बदलापूर येथे झालेल्या अमानुष कृत्या बद्दल चोपडा तालुक्यात मुकमोर्चा काढून याबाबत लवकरात लवकर निकाल लावण्याकरिता मा. तहसीलदार या...

 कोलकत्ता व बदलापूर येथे झालेल्या अमानुष कृत्या बद्दल चोपडा तालुक्यात मुकमोर्चा काढून याबाबत लवकरात लवकर निकाल लावण्याकरिता मा. तहसीलदार यांना दिले निवेदन


प्रतिनिधी चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाने कोलकत्ता व बदलापूर येथे झालेल्या अमानुष कृत्या बद्दल आज चोपडा तालुक्यात मुकमोर्चा काढून याबाबत लवकरात लवकर निकाल लावण्याकरिता मा. तहसीलदार यांना निवेदन दिले.

मोर्चा सुरू होण्यापूर्वी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या करुणा चंदनशिव यांनी या वेळी आपले मत मांडले. झालेल्या घटना ह्या माणूसकीला काळीमा फासणारी आहे, याबाबत शासनाने कडक कारवाई करून कायद्यात याबाबत तरतूद करावी.

आपण समाजात वावरताना असतांना डॉक्टरांना व लहान लेकरांना देव मानतो आणि घडलेला प्रकार हा आपल्या माणुसकीवर प्रश्न चिन्ह उभा करतो

अनेक योजना शासन महिलांन करिता राबवत असते परंतु जर भारत देशात महिला सुरक्षीत नाही तर त्या योजना  कोणाकरिता .

ह्या मोर्चाद्वारे आम्ही नराधमाला लवकरात लवकर शिक्षा द्यावी ही मागणी करीत आहोत.

मुक मोर्चा करिता महाविद्यालयाचे समन्वयक श्री विलास गुलाबराव दारूंटे तसेच सर्व विद्यार्थी , शिक्षक कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी 

प्रयाग जाधव, नेहा चंदनशिव ,भावना जाधव ,कानन पाटील ,आकाश माळी, अपूर्वा मांनमोठे , विजय सोनवणे, मंजू वैद्य व शिक्षकेतर कर्मचारी मो. तबरेज, संगीता मोरे, राहुल पाटील , रितेश पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते मुक मोर्चाच्या यशस्विते करीता संस्थेचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव माननीय डॉ स्मिताताई संदीप पाटील 

यांचे अनमोल सहकार्य लाभले.

No comments