मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिराचे बाल चित्रकला स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर हे संपादन. प्रतिनिधी चोपडा संपादक :- हेमकांत गायकवाड ...
मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिराचे बाल चित्रकला स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर हे संपादन.
प्रतिनिधी चोपडा
संपादक :- हेमकांत गायकवाड
जळगाव येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी शासकीय बाल चित्रकला स्पर्धेत तालुकास्तरावर यश मिळवलेले आहे.
शासकीय बालचित्रकला स्पर्धा दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी भगीरथ शाळेत घेण्यात आली या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी या गटात एकूण 14 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते त्यापैकी साक्षी लहू सोनवणे इयत्ता सातवी हिने तालुकास्तरावर क्रमांक मिळवलेला आहे
या विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक सुनील दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माया आंबटकर बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर .एस .डाकलिया व मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी सदस्य सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन चा वर्षाव केलेला आहे.
No comments