सावद्यातील युवकाचा तापी नदीत बुडवून मृत्यू:सावदा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद " जादुटोणा कायद्यांतर्गत नरबळीचा गुन्हा दाखल व्हावा म्...
सावद्यातील युवकाचा तापी नदीत बुडवून मृत्यू:सावदा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
"जादुटोणा कायद्यांतर्गत नरबळीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून नातेवाईकांचा सावदा पोलीस ठाण्यात ठिय्या"
रावेर प्रतिनिधी :- मोहसीन तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
देवीच्या पुजेसाठी हतनूर धरणाच्या खाली तापी नदीवर गुलाब सुरेश तायडे वय २६ रा.मदिना नगर सावदा ता.रावेर हे त्याचे मित्र प्यारेलाल रामकृष्ण लोखंडे त्याच्यासोबत दि.१९ ऑगस्ट रोजी गेला असता तिथे त्याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा पोलिसांनी व आमचे नातेवाईकांनी शोध घेतला असता त्याचे प्रेत दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी ५-३० वाजेच्या सुमारास रायपुर ता.रावेर शिवारातील नदीपात्राचे किनाऱ्यालगत मिळून आले असून,ते नदीच्या पाण्यात पळून बुडून गुलाब तायडे नवतरुण मयत झाला आहे.याबाबतची खबर सावदा येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी अनिकेत जीवन सुरवाडे यांनी दिल्यावरून अ.मृ.रजि.नं.२०/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे सावदा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सदरील तरुणाचा आज दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी अंतिम संस्कार झाल्यानंतर थेट नातेवाईकांनी सावदा पोलीस ठाण्यात जन आंदोलन केले असता सोबत असलेल्या दोघा व्यक्तींवर जादुटोणा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी मयताचे नातेवाईकांनी तब्बल ३ तास लावून धरली असताना सदर आरोपी आमच्या ताब्यात द्यावा असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.तसेच सदर कायद्या अन्वे जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून उठणार नाही.अशी भूमिका देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण होता.यावेळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतील. असे आश्वासन मयताचे नातेवाईकांशी चर्चा करताना दिल्याचे समजते.याप्रसंगी निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे,फैजपूर पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक सैय्यद व सावदा पोस्टेचे सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी जमावस शांत केले.यावेळी निंभोरा,फैजपूर,सावदा येथील पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात होते.
*स्वत:ला कांलीकेचा भक्त म्हणून भोंदूगिरी करणारा बाबा?*
सावदा येथे स्वतःला कांलिकेचा भक्त म्हणून घेणारा बाबा यांनी मयत व्यक्तीस काहीतरी आमिष दाखवत नदीपात्रात नेऊन, सदरील.मयत व्यक्तीने त्या भोंदू बाबा वर विश्वास ठेवूला असता त्याला या नदीच्या पाण्यात डुबकी लावण्यास सांगितले. सदरील व्यक्ती नदी पाण्यातून वर न आल्याने तो बुळाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.तश्या प्रकारचा व्हिडिओ देखील नातेवाईकांकडे असल्याचे समजते.तर यामुळे काहीतरी प्राप्त करण्यासाठी.सदरील युवकाचा नरबळी दिल्याची शहरात सर्वत्र चर्चा करण्यात येत आहे.तरी या संशयित बाबांवर जादूटोण्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईक करीत होती. यासंदर्भात पोलिसांना मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अर्ज दिल्याचे समजते.

No comments