चोपड्यात कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात विद्यार्थीनींनी घेतली " नशा मुक्ती "ची प्रतिज्ञा नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो...
चोपड्यात कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात विद्यार्थीनींनी घेतली " नशा मुक्ती "ची प्रतिज्ञा
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)ज
जळगाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रथमता नशा मुक्तीची प्रतिज्ञा घेऊन , व्यसनाधीनतेच्या विरोधात विद्यार्थिनींनी पदयात्रा काढली सांस्कृतिक स्पर्धा, तसेच व्यसनमुक्ती बाबत व्याख्यान असे विविध कार्यक्रम पार पडले.
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय यांच्या सूचनेनुसार विकसित भारत चा मंत्र "भारत हो नशे से मुक्त" या संकल्पनेवर आधारित भारताला अमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीने व मादक पदार्थाच्या गैरवापराचा प्रतिबंध करण्याकरता नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे त्याअनुषंगाने हे कार्यक्रम साजरे झाले. यावेळी अधिक्षिका कावेरी कोळी, अध्यक्ष महेश शिरसाठ, कर्मचारी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments