चोपडा तालुका व शहर भारतीय काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन नेशन...
चोपडा तालुका व शहर भारतीय काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड
चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय)कमिटीच्या वतीने आज दिनांक १४/०८/२०२४ वार बुधवार रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अँड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी मनोगतात ॲड.भैय्यासाहेबांनी स्वर्गीय विलासरावजी यांचे सरपंच पदापासुन ते मुख्यमंत्री पदापर्यंत असताना त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील विविध अनुभव,त्याची कार्यकुशलता,संघटन,वक्तृत्वशैली,प्रशासकीय कामावरअसलेली पकड व दबदबा याबाबतीत कार्यकर्त्यांना अवगत केले,
यावेळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेश सिताराम पाटील ,तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,सुतगिरणी संचालक,अँड.एस.डी.पाटील,शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण किसान काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, डॉ.अशोकराव कदम,रमाकांत सोनवणे,यशवंत खैरनार ,विकास जनकराव पाटील,देवकांत चौधरी ,प्रशांत सोनवणे,दिलीप पाटील,भागवत पाटील, रविंद्र कूड़ाळकर,जयवंतराव पाटील आदी नेते,पदाघिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*
No comments